दोन सुपर ओव्हरचा थरार! भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताने अफगाणिस्तानला तिसऱ्या टी-२० सामन्यात हरवून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेत सामना आपल्या बाजूने करून घेतला. सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हर थरार असताना भारताने विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला.  भारताने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय … The post दोन सुपर ओव्हरचा थरार! भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय appeared first on पुढारी.

दोन सुपर ओव्हरचा थरार! भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  भारताने अफगाणिस्तानला तिसऱ्या टी-२० सामन्यात हरवून मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेत सामना आपल्या बाजूने करून घेतला. सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हर थरार असताना भारताने विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला.  भारताने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दोन सुपर ओव्हरमध्ये भारताने अफगाणिस्तानवर विजय मिळवला.
भारताने अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानने २१२ धावा केल्याने हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि १७ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. मात्र रोमहर्षक सामन्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाल्याने भारत अफगाणिस्तान ही चुरशीची लढत पहायला मिळाली.
भारत-अफगाणिस्तान सामन्यात दोन सुपर ओव्हरचा थरार
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने भारतासमोर १७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने १६ धावा केल्यानंतर हा सामना पुन्हा सुपर ओव्हर मध्ये आला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाकडे पहिली इनिंग होती. भारताकडून रोहित शर्मा आणि रिंकू सिंग फलंदाजीला आले. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने गोलंदाजी केली. या दुसऱ्या सुपर ओव्हर सामन्यात भारताने १२ धावांचे आव्हान ठेवले होते आणि विकेट गमावल्या होत्या. अखेर तब्बल दोन सुपर ओव्हरनंतर अफगाणिस्तानच्या दोन विकेट घेऊन भारताने हा सामना आपल्या नावावर केला.
हेही वाचा

IND vs AFG T20 : भारताचे अफगाणिस्तानला 213 धावांचे लक्ष्य, रोहित-रिंकूची धमाकेदार खेळी

Latest Marathi News दोन सुपर ओव्हरचा थरार! भारताचा अफगाणिस्तानवर रोमहर्षक विजय Brought to You By : Bharat Live News Media.