पैठण : चितेगावमध्ये चॉकलेट घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षाच्या चिमुरड्याचा बसच्या धडकेत मृत्यू

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चितेगाव येथे आईसोबत चॉकलेट आणण्यासाठी निघालेल्या एका चार वर्षीय मुलाचा शाळेच्या बसच्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १७) रोजी घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड करत स्कूल बस पेटवून दिली आहे.
दरम्यान, घटनेची खबर मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अग्निशमक दलाला पाचारण करून पेटवून दिलेली बसची आग विजवण्यात आली असून. अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव शाहरुख पठाण (वय ४ वर्षे रा. चितेगाव ता.पैठण) असे आहे. या अपघातात मुलाची आई देखील जखमी झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चितेगाव येथील पांगरा रोडवर चार वर्षांचा शाहरुख पठाण आपल्या आईचा बोट धरून किराणा दुकानात चॉकलेट आणण्यासाठी जात होता. याचवेळी तिथून जाणाऱ्या एका शाळेच्या बसने आई आणि मुलाला जोराची धडक दिली. यामध्ये आई देखील गंभीर जखमी झाली. मात्र, शाहरुख पठाण बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ अपघातग्रस्त आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलाला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या अपघातामुळे संताप्त झालेल्या नागरिकांनी वाहनाची तोडफोड करत स्कूल बस पेटवून दिली. या अपघाताची नोंद बिडकीन पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Latest Marathi News पैठण : चितेगावमध्ये चॉकलेट घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षाच्या चिमुरड्याचा बसच्या धडकेत मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
