वाशिम: अंगावर भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

वाशिम: Bharat Live News Media वृत्तसेवा : वाशिम शहरातील दंडे चौकात घराचे काम सुरू असताना अंगावर भिंत कोसळून मजूर जखमी झाला होता. ही घटना मंगळवारी रात्री घडली होती. दरम्यान, उपचारादरम्यान त्याचा आज (दि.१७) मृत्यू झाला. मनोहर विठ्ठल कदम (वय ४८) असे मृत मजुराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दंडे चौकात एका घराचे काम सुरु होते़. यावेळी जुनी भिंत पाडताना मजुराच्या अंगावर भिंत कोसळून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला शे़इकबाल शे़ इस्माईल यांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा
वाशिम : हळद प्रक्रिया यंत्रात अडकून एका महिला कामगाराचा मृत्यू!
वाशिममध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने जेलभरो आंदोलन
वाशिम: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा चक्काजाम
Latest Marathi News वाशिम: अंगावर भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
