IND vs AFG : विराट कोहली गोल्डन डक! भारताला सलग दुसरा धक्का

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सलग दोन सामने जिंकून टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा हा सामना जिंकून पाहुण्या अफगाणिस्तानला क्लिन स्विप देण्याचा जोरदार प्रयत्न करेल.
भारताने टॉस जिंकला
भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले आहेत. संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव यांचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचवेळी जितेश शर्मा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या प्लेइंग-11 मध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नवीन उल हक, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी यांना प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे.
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान.
अफगाणिस्तानचा संघ : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.
Latest Marathi News IND vs AFG : विराट कोहली गोल्डन डक! भारताला सलग दुसरा धक्का Brought to You By : Bharat Live News Media.
