हिंगोली : वारंगा फाटा येथे ट्रक अपघातात तरुण जागीच ठार

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील नागपूर – वारंगा महामार्गावरील वारंगा फाटा येथे ट्रकने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकमधील एक जण जागीच ठार झाला. ही घटना आज (दि.१७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. बालाजी अंकुश दैठणेकर (वय २३, रा. खांबेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … The post हिंगोली : वारंगा फाटा येथे ट्रक अपघातात तरुण जागीच ठार appeared first on पुढारी.

हिंगोली : वारंगा फाटा येथे ट्रक अपघातात तरुण जागीच ठार

आखाडा बाळापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील नागपूर – वारंगा महामार्गावरील वारंगा फाटा येथे ट्रकने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकमधील एक जण जागीच ठार झाला. ही घटना आज (दि.१७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. बालाजी अंकुश दैठणेकर (वय २३, रा. खांबेगाव, ता. लोहा, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर – वारंगा महामार्गावरून आज सकाळी ५ वाजता वटाण्याच्या शेंगा घेऊन जाणारा ट्रक (एमएच 26 बी इ 8191) नागपूर येथून लातूरकडे होता. यावेळी वारंगा फाट्याजवळ हा ट्रक समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकला. या अपघाताची बातमी कळताच वारंगा फाटा पोलीस मदत केंद्राचे बीट जमादार रोहिदास राठोड, प्रभाकर भोंग यांनी घटनास्थळी धाव घेतली. बालाजी याचा मृतदेह केबिन बाहेर काढून डोंगरकडा येथे आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा 

हिंगोली: कळमनुरी मार्गावर दुचाकी अपघात : दोन जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा
हिंगोली : आई, वडीलासह मुलाचा अंत; उपचारासाठी निघाले होते कुटुंब

Latest Marathi News हिंगोली : वारंगा फाटा येथे ट्रक अपघातात तरुण जागीच ठार Brought to You By : Bharat Live News Media.