आलिया भट्टला आवडला ‘१२ वी फेल’ !

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) किती गुणी कलाकार आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही, ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘गंगुवाई काठियावाडी’पासून ते ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’पर्यंतचे अनेक चित्रपट तिच्या अभिनय क्षमतेची साक्ष देणार आहेत. एके काळी तिच्या अतिसामान्य ‘सामान्य ज्ञाना’ची खिल्ली उडवली … The post आलिया भट्टला आवडला ‘१२ वी फेल’ ! appeared first on पुढारी.
आलिया भट्टला आवडला ‘१२ वी फेल’ !

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ( Alia Bhatt ) किती गुणी कलाकार आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही, ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘गंगुवाई काठियावाडी’पासून ते ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’पर्यंतचे अनेक चित्रपट तिच्या अभिनय क्षमतेची साक्ष देणार आहेत. एके काळी तिच्या अतिसामान्य ‘सामान्य ज्ञाना’ची खिल्ली उडवली जात होती. तिचे अगाध ‘जनरल नॉलेज’ पाहून अनेकांना ती किती शिकली आहे, याचेही कुतूहल वाटू लागले होते. अर्थात, तिचे शिक्षण किती आहे, यामुळे तिच्या करिअरवर काहीही फरक पडलेला नाही; मात्र आता खुद्द आलियाच ‘१२ वी फेल’चे कौतुक करीत आहे.
संबंधित बातम्या 

Genelia D’Souza : सून असावी तर जेनेलियासारखी !
priyanka chopra- Malti : दिलवाला स्वेटर अन् क्यूटनेस…; प्रियांका-निकच्या मुलगी मालतीची एल्मो थीम
Esha Deol : ‘आई- वडिलांच्या पावलांवर पाऊल…’; हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल घेणार घटस्फोट?

याचा अर्थ ती बारावी नापास होण्याचे समर्थन करीत नसून, विधू विनोद चोप्रांच्या ‘१२ वी फेल’ नावाच्या चित्रपटाचे कौतुक करीत आहे. तिने सोशल मीडियात लिहिले आहे की, ‘नजीकच्या काळात मी पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटापैकी एक. अतिशय सुंदर परफॉर्मन्स, खूपच सुंदर, विक्रांत मेसी… तू शानदार आहेस, मी खरोखरच थक्क झाले!’.
आलियाने चित्रपटाची हिरोईन मेधा शंकर हिला चित्रपटाचा आत्मा आणि हृदयही म्हटले आहे. १२ वी फेल हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर ५४.१८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आलियाने तो आता पाहून त्याचे कौतुक केले आहे!.
Latest Marathi News आलिया भट्टला आवडला ‘१२ वी फेल’ ! Brought to You By : Bharat Live News Media.