सून असावी तर जेनेलियासारखी !

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठी, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ( Genelia D’Souza ) बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. दोघेही नेहमी सोशल मीडियाच्या माघध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. अमराठी कुटुंबात जन्म घेतलेल्या जेनेलियाने मराठी संस्कृती आपलीशी करून घेतली आहे. महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील सर्वच सण अत्यंत आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करत असते. मकर संक्रांतही तिने पारंपरिक साजरी केली आहे. जेनेलियाने मकर संक्रांतीनिमित्त देवाची पूजा करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संबंधित बातम्या
priyanka chopra- Malti : दिलवाला स्वेटर अन् क्यूटनेस…; प्रियांका-निकच्या मुलगी मालतीची एल्मो थीम
Raveena Tandon : रविनाने नाकाराला होता ‘कुछ कुछ होता है’!
Ranbir Kapoor : युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर?
या व्हिडीओत ती ( Genelia D’Souza ) देवाची छान पूजाअर्चा करताना दिसत आहे. तिने देवासमोर छान फुलांची आरास केली आहे. सुगड पूजन केले आहे. त्याशिवाय एका डिशमध्ये देवाला नैवेद्यही ठेवला आहे. त्यामुळे जेनेलियाने मराठी पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत साजरी केल्याचे दिसून येत आहे. जेनेलियाने चाहत्यांना मकर संक्रांत सणाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. आता जेनेलियाच्या व्हिडीओला प्रतिसाद देत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सून असावी तर जेनेलियासारखी अशी एकाने, तर तिने मराठी संस्कृती पूर्णपणे आत्मसात केली असल्याची प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने व्यक्त केली आहे.
Latest Marathi News सून असावी तर जेनेलियासारखी ! Brought to You By : Bharat Live News Media.
