
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : न्याय व्यवस्थेच्या निकालातून जातीय वास येतो, असे वक्तव्य मी केलेले नाही, असा घूमजाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. न्याय व्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असे विधान आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, डॉ आशीष देशमुख आदी नेत्यांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर विदर्भात असलेल्या आव्हाडांनी आज (दि.१७) यू टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. Jitendra Awhad
दरम्यान, राज्यातील नेत्यांनी खरेतर रामटेकला येणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथूनच अधर्माविरोधात लढण्याची आणि सीतामाईला परत आणण्याची प्रतिज्ञा प्रभू श्रीराम यांनी घेतली. याविषयीचे इतिहासातील पुरावे देऊ शकतो. मी बोलतो ते पुराव्यानिशी सांगतो. Jitendra Awhad
आज देश एककल्ली कारभाराने चालत असल्याने भविष्यात देशात विघटनवादाचा धोका आहे. मी बोलत नाही कारण उगीच वाद निर्माण होतो. काही काही जजमेंट अशी येतात, त्यातून जातीचा वास यायला लागतो. न्याय व्यवस्था ही नॉन बायस असली पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. बाबासाहेबांना मिठी मारायची असेल, तर प्रत्येक मानवाने मारली पाहिजे. संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे. मात्र, न्याय व्यवस्थेत आरक्षण न देऊन ८० टक्के समाजावर बाबासाहेबांनी अन्याय केला.
आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ‘‘न्याय व्यवस्थेच्या निकालातून जातीय वास येतो, असे बोललो नाही,’’ असा घुमजाव आव्हाड यांनी केला आहे. ही वैचारिक लढाई आहे. लोकांना विचार मांडणे आवडत नाही कारण एखादा विचार मांडला की, शिव्या देत सगळे रस्त्यावर येतात’, असे आपण बोलल्याचे ते म्हणाले.
‘‘मी तो काल विषय मांडला आणि तिथेच मी तो विषय संपवलेला आहे. मी माझी शंका होती, ती व्यक्त केली. माझे विचार होते. ते मी मांडत असतो. समाजाला पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक. माझ्या विचारांना मान्यता द्या, अशी मी कोणावर जबरदस्ती करत नाही’, असेही ते म्हणाले. मी शांत बसणारा माणूस नाही. माझ्या आईला कधीही पूजेला बोलावत नव्हते. ती माझ्या मनातील वेदना आहे. मी वाचत गेलो आणि वर्णद्वेष समजत गेलो, असेही आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात काँग्रेसला मोठे खिंडार : डॉ आशीष देशमुख
नागपूर : रामदेव बाबा यांच्या वक्तव्याच्या विरोधात ओबीसी समाज रस्त्यावर
नागपूर : वेदमूर्ती गोविंदशास्त्री आर्वीकर यांचे निधन
Latest Marathi News मी तसे बोललोच नाही, जितेंद्र आव्हाड यांचे ‘त्या’ विधानावर घूमजाव Brought to You By : Bharat Live News Media.
