वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; अंगणवाडी सेविका मागण्यांसाठी आंदोलन

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) कर्जत तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व युवा अध्यक्ष बुवासाहेब चव्हाण व जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके यांनी केले. आंदोलनामध्ये शहराध्यक्ष राहुल पोळ, जिल्हा प्रवक्ते दादा समुद्र, महासचिव सोमनाथ भैलुमे, महेश धावडे, कांतिलाल भिसे, राजू खंडागळे, अक्षय … The post वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; अंगणवाडी सेविका मागण्यांसाठी आंदोलन appeared first on पुढारी.

वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; अंगणवाडी सेविका मागण्यांसाठी आंदोलन

कर्जत : Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) कर्जत तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व युवा अध्यक्ष बुवासाहेब चव्हाण व जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके यांनी केले. आंदोलनामध्ये शहराध्यक्ष राहुल पोळ, जिल्हा प्रवक्ते दादा समुद्र, महासचिव सोमनाथ भैलुमे, महेश धावडे, कांतिलाल भिसे, राजू खंडागळे, अक्षय भालेकर, तुषार धावडे, अतुल परदेशी, तुकाराम पवार, भाऊ पोटरे, पोपट थोरात, अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा राजश्री कुलकर्णी, सुनीता खेडकर, श्रीमती वांगडे आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या वेळी चंद्रकांत नेटके म्हणाले की, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. मात्र, तीन पायाचे लंगडे सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आज ‘वंचित’तर्फे तहसील कार्यालयावर जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला आहे. या आंदोलनाची सरकारने तत्काळ दखल घ्यावी; अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रकांत नेटके यांनी दिला.
या वेळी युवा अध्यक्ष बुवासाहेब चव्हाण म्हणाले की, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या योग्य आहेत. इतकी वर्ष काम करूनही अद्यापही यांना राज्य सरकारचा दर्जा दिलेला नाही हे पूर्णपणे चुकीचे आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बुवासाहेब चव्हाण यांनी दिला. या वेळी राजश्री गायकवाड व संगीता खेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका करून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध संघटनेतर्फे करण्यात आला.
हेही वाचा

आरोप करण्यापेक्षा कर्तृत्व सिद्ध करा : खासदार सुजय विखे
धांदरफळ येथील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
दहा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; अंगणवाडी सेविका मागण्यांसाठी आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.