धांदरफळ येथील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : धांदरफळ खुर्द येथील डीजेने चिरडल्यामुळे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमी तरुणाचाही मुंबईत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, घटनेतील मयत तिघांचीही परिस्थिती जेमतेम असल्याने डीजे मालकाने पाच आणि नवरदेवाच्या वडिलांनी पाच असे प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरच अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे यांच्यावर … The post धांदरफळ येथील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत appeared first on पुढारी.

धांदरफळ येथील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

संगमनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा : धांदरफळ खुर्द येथील डीजेने चिरडल्यामुळे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमी तरुणाचाही मुंबईत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, घटनेतील मयत तिघांचीही परिस्थिती जेमतेम असल्याने डीजे मालकाने पाच आणि नवरदेवाच्या वडिलांनी पाच असे प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरच अभिजीत उर्फ गणेश संतोष ठोंबरे यांच्यावर रात्री साडेबाराच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात डीजे मिरवणुकीत घुसल्याने बाळासाहेब खताळ, भास्कर खताळ आणि गणेश ठोंबरे यांचा मृत्यू झाला. या तिघांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी डिजे चालक आणि नवरदेवाच्या वडिलांना मदतीचे आवाहन केले होते. त्यासाठी संगमनेरचे पो.नि देविदास ढुमणे व गावातील काही जणांनी महत्वाची भुमिका बजावली. त्यानंतर डी जे मालक आणि नवरदेवाच्या वडिलांनी गावातील मंदिरासमोर प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याचे तयारी दर्शविली. त्यानंतर गणेश ठोंबरे याच्यावर अंत्यसंस्कार झाले. दशक्रियाविधीपूर्वी ही मदत दिली जाणार आहे.
हेही वाचा

दहा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
Nashik Cold News : महाबळेश्वरपेक्षाही नाशिकमध्ये अधिक थंडी
कोल्‍हापूर : आरे येथे गव्याच्या धडकेत मेंढपाळ जखमी

Latest Marathi News धांदरफळ येथील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत Brought to You By : Bharat Live News Media.