माणुसकी मेली..! अपघाती मृत्यूनंतर मृतदेहाला अनेक वाहनांनी चिरडले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगण्‍याचा वेग वाढलाय. येथे थांबायला कोणाचा वेळ नाही. सार्‍यानांचा कमालीचे घाई झाली आहे. प्रत्‍येक रस्‍त्‍यावरील हे चित्र आता आपल्‍या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्‍ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्‍याचेही आपल्‍याला कानावर येते. मात्र अपघाती मृत्यू झालेल्याला शेकडो वाहनांनी चिरडल्‍याचा एक दुर्मिण पण माणुसकीलाच … The post माणुसकी मेली..! अपघाती मृत्यूनंतर मृतदेहाला अनेक वाहनांनी चिरडले appeared first on पुढारी.

माणुसकी मेली..! अपघाती मृत्यूनंतर मृतदेहाला अनेक वाहनांनी चिरडले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : जगण्‍याचा वेग वाढलाय. येथे थांबायला कोणाचा वेळ नाही. सार्‍यानांचा कमालीचे घाई झाली आहे. प्रत्‍येक रस्‍त्‍यावरील हे चित्र आता आपल्‍या अंगवळणी पडलंय;पण एखादा अपघात झाला असेल तर किमान थांबणे अपघातग्रस्‍ताला उपचार करणे एवढी तसदीही कोणी घेताना दिसत नसल्‍याचेही आपल्‍याला कानावर येते. मात्र अपघाती मृत्यू झालेल्याला शेकडो वाहनांनी चिरडल्‍याचा एक दुर्मिण पण माणुसकीलाच चिरडणारा प्रकार उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर पाहण्‍यास मिळाला. अपघाती मृत्‍यू झालेल्‍या मृतदेह ओळखीच्या पलीकडे गेला. पोलिसांना अद्याप त्‍याची ओळख पटलेली नाही.  (Multiple cars run over accident victim in Ghaziabad)
गाझियाबादमधील राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर मंगळवारी सकाळी छिन्नविच्छिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळल्‍याने एकच खळबळ माजली. मंगळवारी पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत मृतदेह ओळखीच्या पलीकडे होता. राष्ट्रीय महामार्गावरील वेबसिटी परिसरात पोलिसांच्या पथकाने मृतदेहाचे केवळ काही भाग गोळा केले. (Multiple cars run over accident victim in Ghaziabad)
रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. अपघाती मृत्‍यू झाल्‍यानंतर मृतदेहांवरुन अनेक भरधाव कार धावल्‍या. मृतदेहावरुन वाहने चालविणार्‍या एकाही वाहन चालकाने थांबण्याची तसदी घेतली नाही, याचे आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे. मृतदेहाचे अवयव पोलीस पथकाने एकत्र करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मात्र या अपघातापेक्षा माणुसकीचा काळीमा फासणार्‍या या प्रकाराची चर्चा उत्तर प्रदेशमध्‍ये होत आहे.
 
Latest Marathi News माणुसकी मेली..! अपघाती मृत्यूनंतर मृतदेहाला अनेक वाहनांनी चिरडले Brought to You By : Bharat Live News Media.