छत्रपती संभाजीनगर : गॅस कटरने एटीएम फोडून १६ लाख लंपास

छत्रपती संभाजीनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल 16 लाख रुपये लंपास केले. ही घटना बुधवारी पहाटे घडली. शहरातील स्टेशन रोडवरील आयडीबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी एटीएम फोडण्यापूर्वी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. शिवाय तेथील वीजपुरवठा खंडीत केला होता.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही.
हेही वाचा :
कोणता झेंडा घेऊ हाती? ; महायुती आणि महाआघाडीमुळे इच्छुक उमेदवारांपुढे पेच
Ayodhya Ram Temple: अयोध्या राम मंदिर ‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी खुले
एका दिवसात माणसाच्या डोक्यात किती येतात विचार?; त्याचा कशावर पडताे प्रभाव
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : गॅस कटरने एटीएम फोडून १६ लाख लंपास Brought to You By : Bharat Live News Media.
