युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर?

पुढारी ऑनलाईन डेस्क : तडाखेबंद खेळीच्या जोरावर अष्टपैलू युवराज सिंग याने क्रिकेट जगतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता तो निवृत्त झाला असला तरी सध्या त्याच्या बायोपिकची जोरदार चर्चा आहे. नुकतेच युवराजने त्याच्या बायोपिकमध्ये कुणी त्याची भूमिका साकारायला हवी, याबाबत भाष्य केले आहे. ( Ranbir Kapoor ) संबंधित बातम्या  Prateik Babbar : प्रतीक बब्बर लवकरच … The post युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर? appeared first on पुढारी.

युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तडाखेबंद खेळीच्या जोरावर अष्टपैलू युवराज सिंग याने क्रिकेट जगतात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता तो निवृत्त झाला असला तरी सध्या त्याच्या बायोपिकची जोरदार चर्चा आहे. नुकतेच युवराजने त्याच्या बायोपिकमध्ये कुणी त्याची भूमिका साकारायला हवी, याबाबत भाष्य केले आहे. ( Ranbir Kapoor )
संबंधित बातम्या 

Prateik Babbar : प्रतीक बब्बर लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर?
Twinkle Khanna : ५० व्या वर्षी ट्विंकल खन्ना बनली पदवीधर; अक्षय कुमार म्हणाला, ‘तुझ्याबद्दल अभिमान …’ (video)
Rama Raghav Serial : लावण्याने आणली राघववर संक्रांत…

एका मुलाखतीत युवी म्हणाला की, मी नुकताच रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) स्टारर अॅनिमल या सिनेमा पाहिला आहे. त्यामुळे मला वाटते की, रणबीरच माझी बायोपिक योग्य पद्धतीने साकारू शकतो; पण हा सर्वस्वी दिग्दर्शकाचा निर्णय आहे. आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत आणि लवकरच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येवू.
खरे सांगायचे झाल्यास बॉलिवूड आणि क्रिकेटचे नाते जगजाहीर आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी क्रिकेटपटूंच्या बायेपिकमध्ये भूमिका साकारल्या आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या ‘द अनटोल्ड स्टोरी’ बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतने कॅप्टन कूलची भूमिका साकारली होती. तसेच भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या ‘शाब्बास मिथू’ या बायोपिकमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूने मितालीची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Ranbir kapoor fanpage 🔵 (@ranbir_kapoooor)

Latest Marathi News युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर? Brought to You By : Bharat Live News Media.