प्रतीक बब्बर लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता प्रतीक बब्बरचा ( Prateik Babbar ) जन्म झाला, त्यावेळी तो एकाच वेळी भाग्यवानही ठरला आणि अभागीही ठरला. भाग्यवान यासाठी की, त्याचा जन्म स्मिता पाटीलसारख्या अत्यंत गुणी, लोकप्रिय अभिनेत्रीच्या पोटी झाला. अभागी यासाठी ठरला की, त्याच्या जन्मानंतर लगेचच तो मातृसुखाला पारखा झाला! वडील राज बब्बर यांच्याजवळ नव्हे, तर स्मिताच्या आई वडिलांजवळ … The post प्रतीक बब्बर लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? appeared first on पुढारी.

प्रतीक बब्बर लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता प्रतीक बब्बरचा ( Prateik Babbar ) जन्म झाला, त्यावेळी तो एकाच वेळी भाग्यवानही ठरला आणि अभागीही ठरला. भाग्यवान यासाठी की, त्याचा जन्म स्मिता पाटीलसारख्या अत्यंत गुणी, लोकप्रिय अभिनेत्रीच्या पोटी झाला. अभागी यासाठी ठरला की, त्याच्या जन्मानंतर लगेचच तो मातृसुखाला पारखा झाला! वडील राज बब्बर यांच्याजवळ नव्हे, तर स्मिताच्या आई वडिलांजवळ राहून तो लहानाचा मोठा झाला.
संबंधित बातम्या 

Twinkle Khanna : ५० व्या वर्षी ट्विंकल खन्ना बनली पदवीधर; अक्षय कुमार म्हणाला, ‘तुझ्याबद्दल अभिमान …’ (video)
Sidharth Malhotra Birthday : ‘हॅपी बर्थडे माय लव्ह…’ म्हणत कियाराचं सिद्धार्थसोबत लिपलॉक (video)
Shilpa Shetty : शिल्पाने मराठीत दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा ! (video)

‘जाने तू या जाने ना’ मधून पदार्पण केलेल्या प्रतीकने नंतर आरक्षण, धोबी घाट, बागी-२, छिछोरे असे काही चांगले चित्रपट केले. सध्या हा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचे म्हटले जात आहे. ( Prateik Babbar )
गतवर्षी व्हॅलेंटाईनच्या दिवशी या अभिनेत्याने आपल्या प्रेमाचा खुलासा करत तो अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत असल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला. या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. नंतर त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. प्रिया बॅनर्जी अभिनेत्रीबरोबरच मॉडेलदेखील आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत या दोघांनी आपले नाते अधिकृत केले आहे.
अभिनेता प्रतीक बब्बरने २३ जानेवारी २०१९ रोजी सान्या सागरशी लग्न केले होते. लग्नाआधी हे दोघे एकमेकांना डेट करत होते. कालांतराने वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. लग्नाच्या वर्षभरानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला.
प्रिया बॅनर्जी ही अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत ‘जजबा’ चित्रपटात झळकली होती. उत्तम अभिनयाबरोबर मॉडेलिंगमध्ये चमक दाखवणाऱ्या प्रिया बॅनर्जीसोबत प्रतीक बब्बर लवकरच लग्नगाठ बांधेल, अशी माहिती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by prateik patil babbar (@_prat)

 

View this post on Instagram

 
A post shared by prateik patil babbar (@_prat)

Latest Marathi News प्रतीक बब्बर लवकरच दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर? Brought to You By : Bharat Live News Media.