जळगाव जिल्ह्यातील 900 टेंडरमध्ये अनियमिततेचा ठपका तर संभाजीनगरच्या…

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 900 टेंडर मध्ये अनियमितता व संभाजीनगरच्या तीन प्रमुख ठेक्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्याचे पाच अहवाल प्राप्त झालेले असतानाही अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी शासनाची दिशाभूल करून त्यांच्यावर कोणतेच दोषारोप दाखल झालेले नाही व पदोन्नती मिळवण्यासाठी हे सर्व लपविले. या प्रकरणी खडसे यांनी उच्च न्यायालयात अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे … The post जळगाव जिल्ह्यातील 900 टेंडरमध्ये अनियमिततेचा ठपका तर संभाजीनगरच्या… appeared first on पुढारी.

जळगाव जिल्ह्यातील 900 टेंडरमध्ये अनियमिततेचा ठपका तर संभाजीनगरच्या…

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 900 टेंडर मध्ये अनियमितता व संभाजीनगरच्या तीन प्रमुख ठेक्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्याचे पाच अहवाल प्राप्त झालेले असतानाही अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी शासनाची दिशाभूल करून त्यांच्यावर कोणतेच दोषारोप दाखल झालेले नाही व पदोन्नती मिळवण्यासाठी हे सर्व लपविले. या प्रकरणी खडसे यांनी उच्च न्यायालयात अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या विरोधात खटला दाखल केलेला आहे.
जिल्हा विकास नियंत्रण मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये  जिल्ह्यातील सर्व आमदारांनी माझ्या विरोधात निषेधार्थ ठराव केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात व त्या माध्यमातून कामांमध्ये खंड  पडत आहे. खडसे विनाकारण अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या विरोधात तक्रारी करतात. असा ठपका ठेवण्यात आला. या तक्रारींमध्ये सत्यता आहे. विधान परिषदेमध्ये राजकीय दबामुळे कोणी दाद देत नाही. विधान परिषदेच्या वेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी भेट घेऊन सांगितले होते की माझ्यावर दबाव आहेत तुमच्या जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबाव आहे.
चीफ सेक्रेटरी यांनी सुद्धा सांगितले की, यामध्ये मोठा घोटाळा केला आम्हालाही बंधने आहेत. सर्व अहवाल याबाबत शासनाकडून घेतल्याची माहिती खडसे यांनी दिली. याबाबत पाच अहवाल प्राप्त झाल्याचे खडसेनी सांगितले. अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी शासनाची दिशाभूल तसेच विधान परिषदेचे दिशाभूल केलेली आहे. त्यांच्यावर कोणतेही दोषारोप दाखल झालेले नसल्याचे असे सांगून त्यांनी पदोन्नती मिळवलेली आहेत. जिल्ह्यातील 900 टेंडर नियमबाह्य रीतीने दिल्याचे खडसे यांनी म्हणाले व याची चौकशी करावी असेही त्यांनी सांगितले. गोदरी वाघुर भडगाव एरंडोल या संभाजीनगर मधील तीन प्रकरणे जालना रोड, खुलताबाद – फुलंब्री रोड तसेच उड्डाणपूल यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे अहवाल मिळालेले आहेत व शासनाने त्यांना दोषी धरलेले आहेत असे असतानाही त्यांनी हे सर्व लपून पदोन्नती मिळाल्याचा आरोप यावेळी केला.
म्हणूनच संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात खडसेंनी रिट पिटीशन दाखल केलेली आहेत. याबाबत 22 जानेवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की सर्व आमदार मिळून अधीक्षक अभियंतांना पाठीमागे घालण्याचा कारण काय असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मला उच्च न्यायालयावर न्याय मिळण्याच्या विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
Latest Marathi News जळगाव जिल्ह्यातील 900 टेंडरमध्ये अनियमिततेचा ठपका तर संभाजीनगरच्या… Brought to You By : Bharat Live News Media.