Jalgaon Crime : चोपड्यात दीड लाखाची घरफोडी

जळगांव; चोपडा तालुक्यातील चहार्डी गावामध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून एक लाख 43 हजार रुपये सोने चांदीचे दागिने घेऊन पसार झाले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चहार्डी गावात राहणारे चावदास नागो सैदाणे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी (दि. 16) च्या रात्री 2 ते 5.30 वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडून व कडी कोंडा तोडून एक लाख 43 हजार रुपये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम व इतर साहित्य घेऊन पसार झाले. या प्रकरणी चोपडा शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी अजित साळवे करीत आहे.
हेही वाचा :
UGC NET Result : प्रतीक्षा संपली! यूजीसी नेट परीक्षेचा निकाल आज
पंतप्रधानांच्या हस्ते 19 रोजी कास पाणी योजनेचा शुभारंभ
Ram Pran Pratishtha Ceremony : राम मंदिर परिसरात आज हाेणार मूर्तीचा प्रवेश
Latest Marathi News Jalgaon Crime : चोपड्यात दीड लाखाची घरफोडी Brought to You By : Bharat Live News Media.
