पन्नूची पंतप्रधान मोदींना धमकी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : शिख्स फॉर जस्टीस (एसएफजे) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरुपतवंतसिंग पन्नू याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. पन्नू याच्या हल्ल्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 26 जानेवारी रोजी भारतात हल्ला करण्याची धमकी त्याने या व्हिडीओतून दिली आहे. … The post पन्नूची पंतप्रधान मोदींना धमकी appeared first on पुढारी.

पन्नूची पंतप्रधान मोदींना धमकी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : शिख्स फॉर जस्टीस (एसएफजे) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरुपतवंतसिंग पन्नू याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे.
पन्नू याच्या हल्ल्याच्या धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 26 जानेवारी रोजी भारतात हल्ला करण्याची धमकी त्याने या व्हिडीओतून दिली आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी मोदी यांनी सुरक्षे शिवाय येऊन दाखवावे, अशी दर्पोक्ती त्याने केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही धमकी दिली आहे. पंजाबमधील गँगस्टर्सनी एसएफजेमध्ये भरती व्हावे, असे आवाहनही त्याने केले.
The post पन्नूची पंतप्रधान मोदींना धमकी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source