कोल्हापूर : ‘अमेरिकन बंगलो’ जागा सरकारी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या ‘अमेरिकन बंगलो’ या नावाने ओळखली जाणारी सि.स.नं. 259 ही 57 एकर 17 गुंठे जागा सरकारी हक्कात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या जागेबाबत चौकशी अहवाल देणार्‍या तत्कालीन नगरभूमापन अधिकार्‍यांविरोधात शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव सादर करावा, तसेच या जागेवरील अतिक्रमणे काढून टाकण्याचेही आदेश दिले आहेत. शहराच्या … The post कोल्हापूर : ‘अमेरिकन बंगलो’ जागा सरकारी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार appeared first on पुढारी.

कोल्हापूर : ‘अमेरिकन बंगलो’ जागा सरकारी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या ‘अमेरिकन बंगलो’ या नावाने ओळखली जाणारी सि.स.नं. 259 ही 57 एकर 17 गुंठे जागा सरकारी हक्कात घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. या जागेबाबत चौकशी अहवाल देणार्‍या तत्कालीन नगरभूमापन अधिकार्‍यांविरोधात शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव सादर करावा, तसेच या जागेवरील अतिक्रमणे काढून टाकण्याचेही आदेश दिले आहेत.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या जागेच्या मिळकतपत्रिकेवर असणारा ‘ब’ सत्ता प्रकार (भाडेपट्ट्याने दिलेली सरकारी जमीन) कमी करून ‘क’ सत्ता (खासगी मालकी) करण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी दि. 8 एप्रिल 2010 रोजी दिला होता. मात्र, हा आदेश देताना, त्याचे क्षेत्र शून्य इतकेच नोंदविण्यात आले होते. या जागेपैकी काही क्षेत्र बांधकाम विकसकांनी खरेदी दस्ताआधारे विक्रीही केले.
या जागेचा ‘ब’ सत्ता प्रकार रद्द करून ‘क’ करण्यात आला. या निर्णयाला प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी हरकत घेत जिल्हाधिकार्‍यांकडे 9 नोव्हेंबर 2015 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी महापालिका आयुक्त, सहायक संचालक, नगररचना, जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक, नगरभूमापन अधिकारी, तहसीलदार करवीर, सहजिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्यासह विविध ट्रस्ट, बांधकाम व्यावसायिक आदी 18 जणांना प्रतिवादी करण्यात आले होते.
सुनावणीत प्रतिवादींना ही जागा खासगी कशी, तिचा सत्ता प्रकार ‘क’ कसा झाला, याबाबतची योग्य कागदपत्रे सादर करता आली नाही. याप्रकरणी सर्व कागदपत्रांची छाननी, दोन्ही बाजूंनी केलेले युक्तिवाद विचारात घेऊन रेखावार यांनी ही जागा सरकारी असल्याचे स्पष्ट केले. या मिळकतीतील सर्व व्यवहार आणि अनियमिततेची सविस्तर चौकशी करावी. त्यात झालेल्या शर्थभंगानुसार कारवाई करावी, असे आदेश करवीर प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.
Latest Marathi News कोल्हापूर : ‘अमेरिकन बंगलो’ जागा सरकारी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार Brought to You By : Bharat Live News Media.