शरद मोहोळ खून प्रकरण : खुनाच्या एक महिन्यापूर्वी शेलार-मारणेची बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांनी खुनाच्या एक महिन्यापूर्वी बैठक घेतली होती, अशी माहिती  पोलिस सहआयुक्त सुनील तांबे यांनी मंगळवारी (दि. 16) न्यायालयाला दिली. या प्रकरणात विठ्ठल महादेव शेलार (वय 36), रामदास ऊर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय 36, दोघेही रा. मुळशी) यांना अटक … The post शरद मोहोळ खून प्रकरण : खुनाच्या एक महिन्यापूर्वी शेलार-मारणेची बैठक appeared first on पुढारी.

शरद मोहोळ खून प्रकरण : खुनाच्या एक महिन्यापूर्वी शेलार-मारणेची बैठक

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांनी खुनाच्या एक महिन्यापूर्वी बैठक घेतली होती, अशी माहिती  पोलिस सहआयुक्त सुनील तांबे यांनी मंगळवारी (दि. 16) न्यायालयाला दिली. या प्रकरणात विठ्ठल महादेव शेलार (वय 36), रामदास ऊर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय 36, दोघेही रा. मुळशी) यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

तपासी अधिकारी तांबे यांनी न्यायालयाला सांगितले की, गुन्ह्यातील दुसरा मुख्य सूत्रधार गणेश मारणे हा फरार असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. शेलारवर 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच रामदास मारणे हासुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच, शेलार आणि गणेश मारणे यांच्यात मीटिंग कुठे झाले, त्या वेळी अजून कोण कोण उपस्थित होते, तसेच एक वाहन जप्त करायचे असल्याने आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

दरम्यान, सरकारी पक्षाच्या वतीने नीलिमा इथापे-यादव, फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. गोपाळ भोसले यांनी बाजू मांडली. तर, आरोपीच्या वतीने डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालयाच्या रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली.  या वेळी अ‍ॅड. भोईटे म्हणाले की, शेलार याला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, या एकाच कारणासाठी अटक केली आहे. पोलिसांनी ज्या ज्या वेळी तपासासाठी बोलावले तेव्हा तो गेला. या गुन्ह्यात मोक्का लावायचा असल्याने शेलारसारख्याला आरोपी केले असल्याचे युक्तिवादादरम्यान सांगितले.

हेही वाचा

शरद मोहोळ खून प्रकरण : ज्या झाडावर गोळीबाराचा सराव, ते झाडच गायब
स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान : शरद पवार
पर्यटन विकासासाठी कोकणचा डेस्टिनेशन आराखडा

Latest Marathi News शरद मोहोळ खून प्रकरण : खुनाच्या एक महिन्यापूर्वी शेलार-मारणेची बैठक Brought to You By : Bharat Live News Media.