आज वर्ल्ड कप फायनल; जाणून घ्या अहमदाबादचे हवामान कसं असेल?
अहमदाबाद; वृत्तसंस्था : हवामानाची अनिश्चितता पाहता आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. जर मॅचमध्ये पाऊस झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल. डकवर्थ लुईस नियमानुसार जर निकाल नाही लागला तर राखीव दिवशी मॅच पूर्ण केली जाईल. जेथे मॅच थांबली होती तेथून पुन्हा सुरू केली जाईल. जर राखीव दिवशी मॅच झाली नाही तर गुणतक्त्यात अव्वल संघाला विजेता घोषित केले जाईल. (INDvsAUSfinal)
हवामानाचा अंदाज
रविवारी अंतिम सामन्याच्या दिवशी अहमदाबादचे हवामान स्वच्छ असणार आहे. पावसाची शक्यता अजिबात असणार नाही. 25 ते 27 डिग्री सेल्सियस तापमान असेल. हवेचा वेग 8 कि.मी. इतका असेल. संध्याकाळी दव पडेल आणि त्याचा परिणाम देखील दिसेल. ज्यामुळे दुसर्या डावात फलंदाजी करणार्या संघाला फायदा मिळू शकेल. (INDvsAUSfinal)
IPL फायनलमध्ये पडला होता पाऊस
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना १.३ लाख चाहत्यांसमोर होणार आहे. स्पर्धेची स्क्रिप्ट यापेक्षा चांगली असूच शकत नव्हती. हा या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना ठरू शकतो. गेल्या वेळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम फेरी पार पडली तेव्हा पावसाचा व्यत्यय आला होता. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल विजेतेपदाचा सामना जिंकला. पावसामुळे सामना राखीव दिवशी झाला होता. मात्र, यावेळी तशी शक्यता दिसत नाही.
गेले दीड महिना भारतात सुरू असलेल्या क्रिकेटच्या महासंग्रामाची सांगता आज, रविवारी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा जगज्जेता कोण? यासाठी अंतिम युद्ध रंगणार आहे. भारताने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवले. भारत चौथ्यांदा, तर ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार आहेत. यापूर्वी २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि रिकी पाँटिंगचा ऑस्ट्रेलियन संघ लढले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले होते. २० वर्षांपूर्वी झालेल्या या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता भारताला आहे.
The post आज वर्ल्ड कप फायनल; जाणून घ्या अहमदाबादचे हवामान कसं असेल? appeared first on पुढारी.
अहमदाबाद; वृत्तसंस्था : हवामानाची अनिश्चितता पाहता आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. जर मॅचमध्ये पाऊस झाला तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल. डकवर्थ लुईस नियमानुसार जर निकाल नाही लागला तर राखीव दिवशी मॅच पूर्ण केली जाईल. जेथे मॅच थांबली होती तेथून पुन्हा सुरू केली जाईल. जर राखीव दिवशी मॅच झाली नाही तर गुणतक्त्यात …
The post आज वर्ल्ड कप फायनल; जाणून घ्या अहमदाबादचे हवामान कसं असेल? appeared first on पुढारी.