Weather Update : राज्यात भरली हुडहुडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात थंडीची लाट सक्रिय झाली असून, संपूर्ण राज्य गारठले आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक व पुणे शहराचे तापमान 10 अंशांच्या खाली गेले होते. दरम्यान, उत्तर भारतातील किमान तापमान 3 ते 5 अंशांवर गेल्याने या शीतलहरी महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात थंडीची लाट 21 जानेवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान … The post Weather Update : राज्यात भरली हुडहुडी appeared first on पुढारी.

Weather Update : राज्यात भरली हुडहुडी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात थंडीची लाट सक्रिय झाली असून, संपूर्ण राज्य गारठले आहे. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक व पुणे शहराचे तापमान 10 अंशांच्या खाली गेले होते. दरम्यान, उत्तर भारतातील किमान तापमान 3 ते 5 अंशांवर गेल्याने या शीतलहरी महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात थंडीची लाट 21 जानेवारीपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
काश्मीरपासून पंजाब, हरियाणा व दिल्लीपर्यंतच्या शहरांचे किमान तापमान 2 ते 5 अंशांवर खाली आले असून, हरियाणातील हिस्सारमध्ये 1.1 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. पंजाब, हरियाणा, चंडीगडसह दिल्लीच्या अनेक भागांमध्ये थंडीची लाट तीव— आहे. शीत लहरीची स्थिती सर्वोच्च पातळीवर असून, दाट धुके आणि थंडीने उत्तर भारत गारठला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. सोमवारपासून राज्यातील किमान तापमानात घट सुरू झाली. मंगळवारी संपूर्ण राज्यच गारठले.
लाट अधिक तीव्र होणार…
उत्तर भारतावर शीत लहरी जोरदार सक्रिय असून वार्‍यांचा वेग 140-150 नॉट इतका आहे. हे शीतवारे उत्तर भारताच्या मैदानी भागावर वाहत आहेत. त्यामुळे त्या भागात कडाक्याची थंडी आहे. 17 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर, लडाख काही ठिकाणी हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर 9.2, अहमदनगर 9.6, नाशिक 9.8, पुणे 10.8 अंशांवर
उत्तर भारतातून शीत लहरी आल्या
राज्यात 21 जानेवारीपर्यंत थंडी

राज्याचे मंगळवारचे किमान तापमान…
छत्रपती संभाजीनगर 9.2, अहमदनगर 9.6, नाशिक 9.8, पुणे 10.8, मालेगाव 11.4, सातारा 12.4, परभणी 13.5, नांदेड 14, अकोला 12.3, अमरावती 13.5, बुलडाणा 12.6, चंद्रपूर 14.4, गोंदिया 12.4, नागपूर 14.2, वाशिम 14, वर्धा 14, यवतमाळ 11.5, महाबळेश्वर 14.7, कोल्हापूर 16.9, सांगली 15.8, सोलापूर 14.5, धाराशिव 17, मुंबई 18.8, रत्नागिरी 16.3, डहाणू 15.5.
हेही वाचा

अनुष्ठानांत अनिल मिश्रा यजमान म्हणून पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधी!
प्रभू रामचंद्र सुशासनाचे प्रतीक : पंतप्रधान मोदी
यवतमाळ : संस्थेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात; नव्या नियमामुळे गोंधळ

Latest Marathi News Weather Update : राज्यात भरली हुडहुडी Brought to You By : Bharat Live News Media.