कोगेत वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने तणाव

कसबा बीड, पुढारी वृत्तसेवा : कोगे (ता. करवीर) येथे एकाने टिपू सुलतानचे स्टेटस् लावल्याने मंगळवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. दरम्यान, गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथील एका अल्पवयीनाने आपल्या मोबाईलवर टिपू सुलतानचे स्टेटस् ठेवले होतेे. ही बाब रात्री आठच्या सुमारास गावातील तरुणांच्या … The post कोगेत वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने तणाव appeared first on पुढारी.

कोगेत वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने तणाव

कसबा बीड, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोगे (ता. करवीर) येथे एकाने टिपू सुलतानचे स्टेटस् लावल्याने मंगळवारी रात्री मोठा तणाव निर्माण झाला. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. दरम्यान, गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येथील एका अल्पवयीनाने आपल्या मोबाईलवर टिपू सुलतानचे स्टेटस् ठेवले होतेे. ही बाब रात्री आठच्या सुमारास गावातील तरुणांच्या निदर्शनास आली. काही तरुणांनी याची माहिती पोलिसपाटील यांना देऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. इतक्यात गावातील पाचशे-सहाशे तरुणांनी त्या अल्पवयीनाच्या घरावर मोर्चा काढून जाब विचारला.
दरम्यान, करवीर पोलिसांनी त्या अल्पवयीनाला ताब्यात घेतले. यावेळी जमावाने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. पोलिसांनी पुढील कारवाईसाठी अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. यावेळी गावात मोठा तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Latest Marathi News कोगेत वादग्रस्त स्टेटस् ठेवल्याने तणाव Brought to You By : Bharat Live News Media.