देशात अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर

मुंबई :  देशातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण आणि दिवसेंदिवस भर पडणार्‍या वाहनांच्या संख्येमुळे महाराष्ट्र हा अपघातांचा डार्क स्पॉट ठरू लागला आहे. वाहनांच्या अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्र देशात तिसर्‍या क्रमाकांवर पोहोचला आहे. 2021 मध्ये अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 13 हजार 528 इतकी होती, त्यात आता भर पडून 2023 मध्ये ही संख्या … The post देशात अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर appeared first on पुढारी.

देशात अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर

राजन शेलार

मुंबई :  देशातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण आणि दिवसेंदिवस भर पडणार्‍या वाहनांच्या संख्येमुळे महाराष्ट्र हा अपघातांचा डार्क स्पॉट ठरू लागला आहे. वाहनांच्या अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्र देशात तिसर्‍या क्रमाकांवर पोहोचला आहे. 2021 मध्ये अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 13 हजार 528 इतकी होती, त्यात आता भर पडून 2023 मध्ये ही संख्या 15 हजार 9 इतकी झाली आहे. दरम्यान, धोकादायक अपघात प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण सुरू असून, त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना राज्य सरकारने जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत.
देशपातळीवर वाहन अपघातांना आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता दरवर्षी एकाचवेळी संपूर्ण देशभरात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ आयोजित करण्यात येते. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यातील अपघातांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रातील अपघातांची आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या समोर आली.
देशात रस्ते अपघातांत 2022 मध्ये 1 लाख 68 हजार 491 लोकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यात महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 15 हजार 224 इतकी आहे. 2021 च्या तुलनेत अपघातांची ही संख्या 12.5 टक्क्यांनी वाढली होती. 2021 मध्ये अपघातांत मृत्यू पडलेल्यांची संख्या 13 हजार 528 इतकी होती; तर 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये अपघातांच्या संख्येत 1.4 टक्के इतकी घट होऊन ही संख्या 15 हजार 9 वर पोहोचली होती. राज्यात एकूण होणार्‍या अपघातांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक अपघातांना मानवी चुका कारणीभूत आहेत. त्याचबरोबर धोकादायक वळणे आणि रस्त्यांवरील खड्डेही अपघातांना आमंत्रण देत आहेत. अपघातांना आळा घालण्याबरोबरच चालकांच्या मनोवृत्तीत बदल करण्याकरिता परिवहन विभागामार्फत मुंबई-पुणे हायवे व समृद्धी महामार्गावर समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. वर्षभरात 1 लाख वाहनचालकांना समुपदेशन करण्यात आले आहे.
एकूण 1,004 डार्क ब्लॅक स्पॉट
राज्यात अपघातांचे एकूण 1,004 डार्क ब्लॅक स्पॉट शोधून काढण्यात आले आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. एकूण ब्लॅक स्पॉटपैकी 145 स्पॉटवर कायमस्वरूपी, तर 219 ठिकाणी उपाययोजना सुरू असून, 359 ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच 281 धोकादायक ठिकाणी उपाययोजनांवर काम सुरू आहे.
Latest Marathi News देशात अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर Brought to You By : Bharat Live News Media.