यवतमाळ : अन्यायकारक करवाढीविरोधात काँग्रेसचे मुंडन आंदोलन

यवतमाळ : Bharat Live News Media वृत्तसेवा : सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात आलेल्या अन्यायकारक करवाढीविरोधात काँग्रेसच्या शहर अध्यक्षांसह अनेकांनी मुंडण आंदोलन करून नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. अन्यायकारक करवाढीच्या विरोधात आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शहर
काँग्रेसने गत १३ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली; आणि अर्धनग्न स्वरूपातील आंदोलन करण्यात आले. सोमवारी आंदोलनाचा १३ वा दिवस होता. या आंदोलनात नगर परिषदेच्या मुर्दाड प्रशासनाची तेरवी म्हणून प्रतीकात्मक स्वरूपातील मुंडण आंदोलन पार पडले. यावेळी जवळपास दहा कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून मुंडण केले. यात काँग्रेसचे शहर अध्यक्ष चंदू चौधरी, लाला तेलगोटे, दिनेश हरणे, पंडित कांबळे, नीलेश राठोड यांच्यासह अनेकांनी मुंडण केले.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे मुख्याधिकारी आणि करवाढ याविषयाचे निवेदन दिले होते. दोन्ही प्रकरणांत कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नाही. मात्र, स्थानिक आमदारांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांची कारवाई समोर झाली नाही काय, असा प्रश्न आता आंदोलकांनी उपस्थित केला आहे. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, बाजार समिती सभापती रवी ढोक, प्रवीण देशमुख, अरुण राऊत, रूपेश सावरकर, लोकेश इंगोले, प्रकाश टेलगोटे, कैलास सुलभेवार, अरुण ठाकूर, अजय किन्हीकर, दिनेश गोगरकर, कमल मिश्रा, अॅड. घनश्याम अत्रे, अनिल गायकवाड, कपिल गजभिये, चचाने, जितेश नवाडे, संजय हाडके, कपिले, संजय देशमुख यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.
Latest Marathi News यवतमाळ : अन्यायकारक करवाढीविरोधात काँग्रेसचे मुंडन आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.
