नंदुरबार: कत्तलीसाठी क्रूरपणे बांधून ठेवलेले गाय बैल जप्त

नंदुरबार – पोलिसांनी अचानक छापा टाकून तपासणी केली असता शहरातील आयार पार्क येथे पत्र्याच्या शेडमध्ये काही गोवंशीय गुरे अत्यंत क्रूर पद्धतीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले. कत्तल करण्याच्या इराद्याने ती गुरं बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने शहर पोलिसांनी शेड मालकाला ताब्यात घेऊन गुरे जप्त केली. ४०,००० रु. किमतीचे ४ बैल व १ गाय असे गोवंशीय जनावरे … The post नंदुरबार: कत्तलीसाठी क्रूरपणे बांधून ठेवलेले गाय बैल जप्त appeared first on पुढारी.

नंदुरबार: कत्तलीसाठी क्रूरपणे बांधून ठेवलेले गाय बैल जप्त

नंदुरबार – पोलिसांनी अचानक छापा टाकून तपासणी केली असता शहरातील आयार पार्क येथे पत्र्याच्या शेडमध्ये काही गोवंशीय गुरे अत्यंत क्रूर पद्धतीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले. कत्तल करण्याच्या इराद्याने ती गुरं बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने शहर पोलिसांनी शेड मालकाला ताब्यात घेऊन गुरे जप्त केली.
४०,००० रु. किमतीचे ४ बैल व १ गाय असे गोवंशीय जनावरे तसेच ४५० रु. किमतीचा१ प्लास्टीकचा ड्रम, २ प्लास्टीकच्या बादल्या यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सलमान याच्या मालकीच्या पत्र्याच्या गोडाऊन मध्ये कत्तल करण्याच्या उद्देशाने वेदना होतील अशा पध्दतीने निदर्यतेने बांधलेल्या स्थितीत एकुण ५ गोवंशीय जनावरे मिळुन आले म्हणुन प्राण्यांना क्ररतेने वागणूक दिल्याच्या आरोपाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पो.नायक खुशाल माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधित करण्याबाबतचा अधि. १९६० च्या कलम ११ (१) (एफ) प्रमाणे संशयित कुरेशी मोहल्ला परिसरातील तथा आय. आर पार्कमधील सलमान बी.कलाम शेख याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोहे फत्तेसिंग पावरा करीत आहेत.
Latest Marathi News नंदुरबार: कत्तलीसाठी क्रूरपणे बांधून ठेवलेले गाय बैल जप्त Brought to You By : Bharat Live News Media.