रत्नागिरी : मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा उत्साहात

साडवली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वराची वार्षिक यात्रा मंगळवारी मारळ येथे उत्साहात पार पडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी यात्रेचा आनंद लुटला. तर मार्लेश्वर, गिरिजादेवी व वाडेश्वर या तिन्ही पालख्यांचे मारळ नगरीत आगमन होताच यात्रेला आलेल्या भाविक नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले. संंगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी एका … The post रत्नागिरी : मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा उत्साहात appeared first on पुढारी.

रत्नागिरी : मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा उत्साहात

साडवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वराची वार्षिक यात्रा मंगळवारी मारळ येथे उत्साहात पार पडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी यात्रेचा आनंद लुटला. तर मार्लेश्वर, गिरिजादेवी व वाडेश्वर या तिन्ही पालख्यांचे मारळ नगरीत आगमन होताच यात्रेला आलेल्या भाविक नागरिकांनी मनोभावे दर्शन घेतले.
संंगमेश्वर तालुक्यातील मारळ येथे सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्रीदेव मार्लेश्वराचे देवस्थान वसले आहे. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव सध्या सुरू असून यादरम्यान सोमवारी दुपारी मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा विवाहसोहळा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. विवाहानंतर मार्लेश्वर, गिरिजादेवी व यजमान वाडेश्वर या तिन्ही पालख्या मार्लेश्वर शिखरावरच थांबल्या. रात्री साक्षीविडे भरण्यात आले.
त्यानंतर मार्लेश्वर शिखरावरून मंगळवारी सकाळी मार्लेश्वराची पालखी आंगवली येथे घरोघरी दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झाली. तर साखरप्याची गिरिजादेवीची व देवरूखची वाडेश्वराची पालखी आपापल्या मुळ स्थानाकडे मार्गस्थ झाली. दरम्यान मंगळवारी सकाळपासूनच मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रेला मारळ येथे प्रारंभ झाला. यावेळी मारळ शाळेपासून ते मारळ येथील मुख्य बसथांब्यापर्यंत विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. या दुकानांमधून विविध वस्तूंची खरेदी करत अबालवृध्द व महिलांनी या यात्रेचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळी या यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली.

मार्लेश्वराची यात्रा सुरू असतानाच पहिल्यांदा गिरिजादेवीच्या पालखीचे मारळ नगरीत आगमन झाले. यानंतर काही वेळानंतर वाडेश्वर व त्यापाठोपठ मार्लेश्वराच्या पालखीचे आगमन झाले. या तिन्ही पालख्यांचे मारळ येथे आगमन होताच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या भाविक नागरिकांनी या पालख्यांचे मनोभावे दर्शन घेतले.

Latest Marathi News रत्नागिरी : मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा उत्साहात Brought to You By : Bharat Live News Media.