नांदेड: रामदास आठवले यांच्या हस्ते पत्रकार पुनवटकर यांच्या पत्नीला १ लाखांचा धनादेश सुपूर्द

वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा : अपघातात मृत्यूमुखी पडलेले आष्टा (ता. माहूर) येथील पत्रकार तथा रिपाई गटाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते भिमराव पुनवटकर यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (दि.१६) भेट घेतली. यावेळी आठवले यांच्या हस्ते पुनवटकर यांच्या पत्नीकडे १ लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी … The post नांदेड: रामदास आठवले यांच्या हस्ते पत्रकार पुनवटकर यांच्या पत्नीला १ लाखांचा धनादेश सुपूर्द appeared first on पुढारी.

नांदेड: रामदास आठवले यांच्या हस्ते पत्रकार पुनवटकर यांच्या पत्नीला १ लाखांचा धनादेश सुपूर्द

वाई बाजार, Bharat Live News Media वृत्तसेवा : अपघातात मृत्यूमुखी पडलेले आष्टा (ता. माहूर) येथील पत्रकार तथा रिपाई गटाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते भिमराव पुनवटकर यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज (दि.१६) भेट घेतली.
यावेळी आठवले यांच्या हस्ते पुनवटकर यांच्या पत्नीकडे १ लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय सोनावणे, नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे, दिगंबर वाघमारे, महिंद्रा मानकर दिग्रस, समाज कल्याण विस्तार अधिकारी मोरे, समाजकल्याण अधिकारी दवणे, बाबाराव केशवे, केशव भगत, प्रकाश गायकवाड, दीपक कांबळे, रवींद्र गायकवाड, रफिकभाई गाईड, अमोल गायकवाड, दत्ता कांबळे, धनिक शेंडे, विजय खरे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा 

नांदेड : माळेगाव यात्रेतील लावणी महोत्वासाठी १ कोटी देणार : खा. प्रतापराव पाटील
नांदेड : माळेगाव यात्रेत श्याम चांदणेने जिंकली मानाची कुस्ती
नांदेड : मॉनिंग वॉकला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News नांदेड: रामदास आठवले यांच्या हस्ते पत्रकार पुनवटकर यांच्या पत्नीला १ लाखांचा धनादेश सुपूर्द Brought to You By : Bharat Live News Media.