नार्वेकरांचे उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाने आज (दि. १६) घेतलेल्या महापत्रकार परिषदेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ठाकरे गटाने या महापत्रकार परिषदेत चांगले मुद्दे मांडतील मात्र असं काहीच झालं नाही. ही पत्रकार परिषद म्हणावी का मेळावा असा सवालही उपस्थित केला. शिवसेना पक्षाच्या 2013 च्या घटना दुरुस्तीचा उल्लेख असलेले पत्र आयोगाकडे नाही त्यामुळे दिलेला निकाल हा सर्वोच्च न्यायालयानुसारच असल्याचे स्पष्टीकरण नार्वेकर यांनी दिले.
त्यांचा नेमका संविधानावर तरी विश्वास आहे का असा सवाल यावेळी ठाकरे गटाला केला. मला तरी असं वाटतं ठाकरेंचा कोणत्याच संस्थेवर विश्वास नाही. मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्षावर निर्णय दिला आहे. त्यानंतर पक्षाची संघटना कशी आहे आणि पक्षाची रचना याचा विचार करण्यात आला आहे. मी कोर्टाच्या नियमानुसार निकाल दिलेला आहे. सुप्रीम कोर्टानुसार सर्वप्रथम मूळ पक्षाचा निकाल दिलेला आहे. आयोगाकडे दाखल झालेल्या घटनेचा दाखल घेण्याची नोंद घेतली आहे. गोगावलेंची निवड चुकीची आहे असं न्यायालयाने म्हटलेलं नाही. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे पक्षाकडे माहिती मागितीली आहेत.
ते पुढे म्हणाले की, मी पक्ष घटनेची सुधारित प्रत मागवली. पण आयोगाला दिलेल्या पत्रात कुठेही घटनेचा उल्लेख नाही. २०१३ साली केलेल्या दुरुस्तीची कोणतीही कॉपी आयोगाकडे नाही. १९९९ ची कॉपी आयोगाकडे आहे. असे स्पष्टकरण नार्वेकर यांनी दिले. तसेच परब कधीही पत्रात काय दिले आहे हे वाचून दाखवत नाहीत असा आरोपही यावेळी केला. कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करण्यात आल्याचे ठामपणे सांगितले.
हेही वाचा
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, माझा तुम्हाला पाठिंबा : ठाकरेंचे शिंदे गटाला आवाहन
Latest Marathi News नार्वेकरांचे उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.
