सांगली : बिऊर – विश्रामबाग येथील जवान तेजस मोरे यांना अखेरचा निरोप

शिराळा, Bharat Live News Media वृत्तसेवा : बिऊर – विश्रामबाग ( ता.शिराळा ) येथील सैन्य दलात कार्यरत असणारे तेजस युवराज मोरे (वय २४) हे आपले कर्तव्य बजावत असताना राजस्थान येथे चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने तेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा रविवारी (दि.१४) मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.१६) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तेजस हे राजस्थान येथे सैन्य दलात कार्यरत होते. ते आपले कर्तव्य बजावत असताना रविवारी चक्कर येऊन पडले. तब्बेत बिघडल्याने तातडीने चंदीगड येथील सेना रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
नायब तहसिलदार हसन मुलानी, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, मंडळ अधिकारी सविता पाटील, गावकामागर तलाठी राहुल काळे, पोलीस पाटील सीताराम पाटील आदी उपस्थित होते. मयत तेजस यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा
सांगली : प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या
शरद पवार आज सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर, काय बोलणार? नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष
लोकसभेसाठी एकसंध राहू; सांगलीत महायुती घटक पक्षांच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार
Latest Marathi News सांगली : बिऊर – विश्रामबाग येथील जवान तेजस मोरे यांना अखेरचा निरोप Brought to You By : Bharat Live News Media.
