३५ साल बाद..! सुमितची ऑस्ट्रेलियन ओपनच्‍या दुसर्‍या फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये माेठी कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत त्याने २७व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. नागलने हा सामना ६-४, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. (Australian Open 2024) नागल 2013 नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला … The post ३५ साल बाद..! सुमितची ऑस्ट्रेलियन ओपनच्‍या दुसर्‍या फेरीत धडक appeared first on पुढारी.

३५ साल बाद..! सुमितची ऑस्ट्रेलियन ओपनच्‍या दुसर्‍या फेरीत धडक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये माेठी कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत त्याने २७व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. नागलने हा सामना ६-४, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. (Australian Open 2024)
नागल 2013 नंतर एकेरीची दुसरी फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. सोमदेव देवबर्मनने 2013 साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. 1989 नंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकेरी सामन्यात पराभूत करण्याची कामगिरी त्याने केली आहे. ही कामगिरी रमेश कृष्णन यांनी 1989 मध्ये केले होते. त्यांनी दुसऱ्या फेरीत स्वीडनच्या मॅट्स विलँडरचा पराभव केला होता. विलँडर तेव्हा टेनिस क्रमवारीत जगातील अव्वल खेळाडू होता. (Australian Open 2024)
सुमित  याआधी 2020 च्या यूएस ओपनमध्ये तो मुख्य ड्रॉमध्ये एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. टेनिस क्रमवारीत अव्वल 100 मध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला त्याने सातव्यांदा पराभूत केले आहे. त्याचबरोबर विरोधी खेळाडूच्या क्रमवारीत सुमितचा हा दुसरा मोठा विजय आहे.
मॅचमध्ये काय घडलं?
सुमितने शानदार सुरुवात करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवले. त्याने तीन वेळा अलेक्झांडरची सर्व्हिस तोडली आणि पहिला सेट ६-४ अशा फरकाने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये तो आणखी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. अलेक्झांडर बुब्लिकनेही काही चुका केल्या आणि त्याचा फायदा घेत नागलने दुसरा सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची लढत झाली आणि टायब्रेकमध्ये नागलने बाजी मारली. त्याने हा सेट 7-6 असा जिंकला आणि सामनाही जिंकला.
&

Sumit Nagal beats Bublik 6-4 6-2 7-6(5) at the Australian Open
Last year, he was outside of the top 500.
He said he had just 900 euros in his bank account at 1 point.
It’s not easy to admit that, but his story was raw, honest, & real.
He made $120,000 today. And he deserves… pic.twitter.com/Ddfv6ofZ4m
— The Tennis Letter (@TheTennisLetter) January 16, 2024
nbsp;
हेही वाचा :

लोणावळ्यात नारायण राणे यांचा निषेध
Nashik News : फोटो काढायचे आहे, अंगावरील दागिने काढा; महिलांची फसवणूक
FIFA best player 2023 : मेस्सीने आठव्यांदा पटकावला ‘फिफा’चा सर्वोत्कृष्ट पुरूष पुरस्कार; स्पेनची बोनमती ठरली सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू

The post ३५ साल बाद..! सुमितची ऑस्ट्रेलियन ओपनच्‍या दुसर्‍या फेरीत धडक appeared first on Bharat Live News Media.