International Men’s Day | आधुनिक बाबा दिवसेंदिवस हळवा होतोय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तुम्ही मुलांना जराही ओरडत नाही, अतिलाड करता, तुमच्या अशा वागण्यामुळे मुले बिघडतील,’ हे बायकोचे बोल अनेक घरांतून कानावर पडतात. मुलांच्या संगोपनात आई कठोर भूमिका घेत असताना आधुनिक बाबा जास्त हळवा होत आहे, हे चित्र आपल्या आता नवीन राहिलेले नाही. (International Men’s Day 2023) पूर्वी अशीच स्थिती होती का? पुरुषांवर कुटुंबाचे पोषण, … The post International Men’s Day | आधुनिक बाबा दिवसेंदिवस हळवा होतोय? appeared first on पुढारी.
International Men’s Day | आधुनिक बाबा दिवसेंदिवस हळवा होतोय?


पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तुम्ही मुलांना जराही ओरडत नाही, अतिलाड करता, तुमच्या अशा वागण्यामुळे मुले बिघडतील,’ हे बायकोचे बोल अनेक घरांतून कानावर पडतात. मुलांच्या संगोपनात आई कठोर भूमिका घेत असताना आधुनिक बाबा जास्त हळवा होत आहे, हे चित्र आपल्या आता नवीन राहिलेले नाही. (International Men’s Day 2023) पूर्वी अशीच स्थिती होती का? पुरुषांवर कुटुंबाचे पोषण, संरक्षण ही जबाबदारी होती त्यामुळे ‘बाबा’ म्हणजे कठोर, सर्वांना धाकात ठेवणारा, असे चित्र घरोघरी दिसायचे. बाबा घरी आले की बच्चेकंपनी चिडीचिपू होऊन अभ्यास करत बसायची. कधी फटका द्यायची वेळ आली तरी बाबा मागे पुढे पाहात नव्हते; पण गेल्या काही वर्षांत घराघरातील हे चित्र बदलू लागले आहे. आता महिलाही कमवत्या झाल्या आहेत. मुलांच्या संगोपनाची जबाबादारी आता आई-बाबा दोघांवरही समसमान येऊन पडली आहे. बदलाच्या या टप्प्यावर बाबा अधिक हळवा होतोय का आणि हे का घडत असेल, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. (International Men’s Day 2023)
सर्वसाधारण मानवी कुटुंब व्यवस्थेत पुरूषाची जबाबदारी ही कुटुंबांचे संरक्षण, भरण पोषण अशी होती. सध्या देखील ही परंपरा कायम आहे. आता महिलांनी आर्थिक जबाबदरी उचललेली दिसते; पण बहुतांशी भारतीय कुटुंबात पुरूष हा जबाबदार व्यक्ती असतो. या सर्व जबाबदाऱ्या हाताळताना त्याला अनेक मानसिक चढ उतारांचा सामना करावा लागतो. काहीवेळा हे पुरूष कुटुंबात मनमोकळेपणाने बोलतात. तर काहीवेळा स्वत: एकटेच वैयक्तिक पातळीवरील मार्ग काढतात. यामुळे त्याच्या मानसिक स्थितीत अनेक बदल कुटुंबातील व्यक्तीला जाणवून येतात. काहीवेळी बाबा अधिक कठोर झालेला जाणवतो, तर काही वेळा तो खूपच हळवा तर कधीकाळी हतबल झालेला दिसून येतो. तर पूर्वी प्रेमळ असलेली आई मात्र आज बाबाच्या तुलनेत अधिक कठोर झालेली जाणवते. (International Men’s Day 2023)
प्रत्येक कुटुंबातील पत्नी, मुलं यांचा हक्काचा व्यक्ती म्हणजे त्या घरचा कर्ता पुरूष. तो मग वडील, काका किंवा आजोबा देखील असू शकतात. हे पुरूष लोक आपल्या कुटुंबाबाबत नेहमीच हळवे असतात; पण काहीवेळा त्यांना व्यवहारातून निर्णय घेताना कठोर व्हावे लागते. यामुळे घरातील अनेक मंडळी या ‘बाबा’वर नाराज देखील होतात. कुटुंबातील एकमेकावरचे रूसवे फुगवे, अबोलपणा हा आळवावरच्या पाण्यासारखा असतो. तो क्षणात येतो, लगेच जातोसुद्धा. बाबा कुटुंबातील आणखी एका व्यक्तीबद्दल खूपच हळवा असतो, ती म्हणजे त्याची ‘मुलगी’. बाबाच्या मनाचा दुसरा हळवा कोपरा म्हणजे त्याची ‘मुलगी’. तिच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या, वाईट प्रसंगाचे पडसाद त्याच्या मनावर पडत असतात.
International Men’s Day 2023: ‘दमलेल्या बाबाची कहाणी’
‘आयुष्यावर बोलू काही’ या अल्बमधील संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी गायलेला ‘दमलेल्या बाबाची कहाणी तुला’ यामध्ये आधुनिक बापाची कहाणी सांगितली आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपण्यापर्यंत बाबाला अनेक प्रसंगातून जावे लागते, लढावे लागते. दैनंदिन जीवनातील सगळ्याच गोड, कडू अनुभव बाबा कुटुंबासोबत शेअर करू शकत नाही. कुटुंबाला सांभाळण्यासाठी बाबा अतोनात कष्ठ करतो. त्यामुळे कुटुंबातील बाबाला जपणे ही कुटुंबातील सर्वांचीच जबाबदारी नाही का?
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन : यंदाची थीम आहे ‘शून्य पुरुष आत्महत्या’
१९ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाची थीम ही शून्य पुरुष आत्महत्या (ZERO MALE SUICIDE) अशी आहे. या थीमवरून असे जाणवते की, खरचं आजचा पुरूष दिवसेंदिवस अधिक संवेदनशील, भावनिक आणि हळवा होतोय अन् टोकाचे पाऊल उचलतोय. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2023 ची थीम ‘शून्य पुरुष आत्महत्या’ आहे, जी पुरुष आणि मुलांना त्यांचे मानसिक आरोग्य व्यवस्थापित करण्यात मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते.
डॉ. कल्याणी कुलकर्णी (MD होमिओपॅथी ॲन्ड कॉन्सिलर)
डॉ. कल्याणी कुलकर्णी (MD होमिओपॅथी अॅन्ड कॉन्सिलर) यांनी ‘पुढारी ऑनलाईन’ शी बोलताना सांगितले की, जेव्‍हा कुटुंबातील स्त्रीया या इतरांच्या गोष्टीत अधिक एनवॉलमेंट दाखवतात. याचा नकळतपणे ताण तिच्या कुटुंबावर येतो, विशेष करून पुरूषावर. कुटुंबातील महिलांचा मोबाईलवरील टाईमस्पॅन वाढला आहे. त्यामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्या, काम याचे विभाजन होत नाही. याचा अनावश्यक ताण कुटुंबातील पुरूषावर येतो. त्यामुळे कुटुंबातील महिलांनी पुरूषांची कामे वाटून घेत, कुटुंब पुढे नेण्यासाठी सहभाग नोंदवला पाहिजे.
येणारी प्रत्येक परिस्थिती स्वीकारावी
पुराण काळापासून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा पुरूषांचा रोल राहिला आहे. तसेच पुरूषांना कोणत्याही गोष्टीचे मायक्रोमॅनेजमेंट जमत नाही. त्यामुळे बहुतांशी लोक इमोशन मॅनेजमेंटही करू शकत नाहीत. त्यांच्या विचारात लवचिकता कमी कमी असते. पण जीवन जगताना ब्रेन फ्लेक्झिब्लेटी महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वत:ला हतबल न करता, हरवून न जाता पुरूषांनी स्थिर रहावे. कोणत्याही परिस्थिती स्वत:ला भरकटण्यापासून रोखावे. येणारी प्रत्येक परिस्थिती स्वीकारावी, म्हणजे ते जास्त डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. तसेच पुरूषांना स्वत:चा स्पेस वापरून Felling Better पासून Getting Better पर्यंतचा मार्ग अवलंबला पाहिजे. Felling Better हे दुसऱ्यावर तर Getting Better हे स्वत:वर अवलंबून असते, असे देखील डॉ. कल्याणी कुलकर्णी म्हणतात.
बहुतांशी सगळेच पुरूष हे हळवे नसतात. केवळ नम्र पुरूष हेच हळवे असतात. करिअर ग्रोथ आणि पालकत्वाच्या भूमिकेत असताना त्याबद्दल आवश्यक ते ज्ञान नसल्याने पुरूष हे अधिक तणावग्रस्त होतात. अनेक पुरूषांना परिस्थिती जुळवून घेता येत नाही. तसेच नातेसंबंधातील संघर्ष हाताळता येत नसेल, तो सहन होत नसेल तरीदेखील पुरूषांना नैराश्य येते. तो हतबळ होतो, असे समुपदेशक प्रसन्न राबडे यांनी ‘पुढारी ऑनलाईन’शी बोलताना व्यक्त केलत
समुपदेशक प्रसन्न राबडे (दिशा मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र)
हेही वाचा:

महिलांच्या “या सवयी” कधीच पुरूषांना आवडत नाहीत
पतीच्या निधनानंतर लेकीसाठी ‘ती’ लढली ‘पुरुष’ होऊन; पुरूषप्रधान व्यवस्‍थेशी ३६ वर्षांचा संघर्ष, नावही बदलले

The post International Men’s Day | आधुनिक बाबा दिवसेंदिवस हळवा होतोय? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘तुम्ही मुलांना जराही ओरडत नाही, अतिलाड करता, तुमच्या अशा वागण्यामुळे मुले बिघडतील,’ हे बायकोचे बोल अनेक घरांतून कानावर पडतात. मुलांच्या संगोपनात आई कठोर भूमिका घेत असताना आधुनिक बाबा जास्त हळवा होत आहे, हे चित्र आपल्या आता नवीन राहिलेले नाही. (International Men’s Day 2023) पूर्वी अशीच स्थिती होती का? पुरुषांवर कुटुंबाचे पोषण, …

The post International Men’s Day | आधुनिक बाबा दिवसेंदिवस हळवा होतोय? appeared first on पुढारी.

Go to Source