खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू ( Khalistani terrorist Pannun) याने जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, अशी माहिती आज (दि.१६) सूत्रांनी दिली. या प्रकरणीबोलताना पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी राज्‍यात गुंडांविरुद्ध कठोर कारवाई केल जात असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेचा म्‍होरक्‍या … The post खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.

खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू ( Khalistani terrorist Pannun) याने जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, अशी माहिती आज (दि.१६) सूत्रांनी दिली. या प्रकरणीबोलताना पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी राज्‍यात गुंडांविरुद्ध कठोर कारवाई केल जात असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.
शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेचा म्‍होरक्‍या आणि खलिस्‍तानी दहशतवादी अशी ओळख असणारा पन्नू याने यापूर्वीही अनेक धमक्‍या दिल्‍या आहेत. गेल्या महिन्यात, त्याने एक व्हिडिओ जारी करुन ज्यामध्ये खलिस्तानी 13 डिसेंबर किंवा त्यापूर्वी भारतीय संसदेवर हल्ला करतील, अशी वल्‍गना केली होती. यानंतर 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाविरोधात तो बरगळला होता 22 जानेवारीपूर्वी अमृतसर ते अयोध्या विमानतळ बंद करण्याची धमकी त्‍याने दिली होती. भारत सरकारने शीख फॉर जस्टिस (SFJ) या संघटनेवर बंदी घातली आहे. तसेच २०२० मध्‍ये त्‍याला दहशतवादी जाहीर केले आहे.
हेही वाचा : 

Ayodhya Ram Mandir : अयाेध्‍येत आज ‘प्रायश्चित’ पूजा, जाणून घ्या या धार्मिक विधीविषयी…
भारतीय स्टार्टअपने देश स्वयंपूर्ण; चांद्रयान ते लष्करी सामर्थ्य वाढविण्यात योगदान
मथुरेतील ईदगाह मशीद ‘सर्वेक्षण’ आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

 
 
Latest Marathi News खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून पंजाबच्‍या मुख्‍यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी Brought to You By : Bharat Live News Media.