अयाेध्‍येत आज ‘प्रायश्चित’ पूजा, जाणून घ्या या धार्मिक विधीविषयी…

पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला आजपासून ( दि.१६) प्रारंभ झाला आहे. आज ब्रह्म मुहूर्तापासूनच विधींना सुरूवात झाली. यामध्ये प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजेला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात झाली आहे. जाणून घेऊया या धार्मिक विधीविषयी..(Ayodhya Ram Mandir) अयोध्येच्या राम मंदिरात अभिषेक विधीला मंगळवारी १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजेला … The post अयाेध्‍येत आज ‘प्रायश्चित’ पूजा, जाणून घ्या या धार्मिक विधीविषयी… appeared first on पुढारी.
अयाेध्‍येत आज ‘प्रायश्चित’ पूजा, जाणून घ्या या धार्मिक विधीविषयी…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला आजपासून ( दि.१६) प्रारंभ झाला आहे. आज ब्रह्म मुहूर्तापासूनच विधींना सुरूवात झाली. यामध्ये प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजेला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात झाली आहे. जाणून घेऊया या धार्मिक विधीविषयी..(Ayodhya Ram Mandir)
अयोध्येच्या राम मंदिरात अभिषेक विधीला मंगळवारी १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजेला सुरूवात झाली आहे. ही पूजा सुमारे ५ तास चालणार आहे. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या या पूजेत १२१ ब्राह्मण सहभागी होणार आहेत. या तपश्चर्या पूजेपासूनच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे सुरूवात मानली जाते. (Ayodhya Ram Mandir)
Ayodhya Ram Mandir: काय आहे प्रायश्चित्त पूजा?
रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी केली जाणारी प्रायश्चित्त पूजा म्हणजे ज्यामध्ये ज्यामध्ये शारीरिक, आंतरिक, मानसिक आणि बाह्य अशा  प्रकारे प्रायश्चित्त केले जाते. बाह्य प्रायश्चितासाठी यजमानाला 10 धार्मिक स्नान करावे लागते. या स्नानामध्ये पंच द्राव्य आणि इतर अनेक पदार्थांचा समावेश हाेताे. यासोबतच गोदान प्रायश्चित्तही आहे ज्यासाठी संकल्प केला जातो. यामध्ये यजमान गोदानाद्वारे प्रायश्चित्त करतात. यामध्ये काही रक्कम दान करून प्रायश्चित्तही केले जाते, या दानामध्ये सोने दान विधीचाही समावेश आहे.
प्रायश्चित्त पूजा कोण करते?
प्रायश्चित्त पूजा सोहळ्यातील यजमानाकडून केली जाते. ही पूजा सामान्य पंडीत करू शकत नाही. या उपासनेमागील मूळ संकल्पना ही आहे की, जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांचे प्रायश्चित करणे. हे एक प्रकारचे शुद्धीकरण आहे. कोणत्याही चुकांसाठी क्षमा मागण्यासाठी हे प्रायश्चित म्हणून केले जाते.
प्रायश्चित्त पूजेसोबत केली जाणारी ‘कर्मकुटी’ पूजा काय आहे?
प्रायश्चित्त पूजेच्या समाप्तीनंतर कर्मकुटी पूजा केली जाते. या पूजेचा अर्थ यज्ञशाळा उपासना असा आहे. यज्ञशाळा सुरू होण्यापूर्वी हवन कुंडाची पूजा केली जाते. यामध्ये भगवान विष्णूची छोटीशी पूजा केली जाते आणि त्यानंतरच मंदिरात प्रवेश करता येतो. मंदिराच्या प्रत्येक भागात प्रवेश मिळवण्यासाठी ‘कर्मकुटी’ पूजा केली जाते आणि त्यानंतरच उर्वरित पूजा विधी सुरू होतात.
‘प्रायश्चित्त’ आणि ‘कर्मकुटी’ पुजेला किती वेळ लागेल?
प्रायश्चित्त पूजेसाठी किमान दीड ते दोन तास लागू शकतात आणि तेवढाच वेळ विष्णूपूजेसाठी लागेल. ही तपश्चर्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाली असून सुमारे ५ तास चालणार आहे. १२१ ब्राह्मण पूर्ण विधीपूर्वक ही पूजा करत आहेत.
प्राणप्रतिष्ठा साेहळ्यातील धार्मिक विधि

१६ जानेवारी – प्रायश्चित्त, कर्मकुटी पूजा
१७ जानेवारी – मूर्तिचा परिसरात प्रवेश
१८ जानेवारी – तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास
१९ जानेवारी – औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास
२० जानेवारी – शर्कराधिवास, फलधिवास, पुष्पाधिवास
२१ जानेवारी – मध्याधिवास, सायंकाळ शैय्याधिवास

हेही वाचा:

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवारंभ
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत १०८ फुटांची अगरबत्ती प्रज्वलित
Ayodhya Ram Mandir : देशात होणार 1 लाख कोटीची उलाढाल!

Latest Marathi News अयाेध्‍येत आज ‘प्रायश्चित’ पूजा, जाणून घ्या या धार्मिक विधीविषयी… Brought to You By : Bharat Live News Media.