जळगाव तालुक्यातील देवस्थानांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

जळगाव  : प्रधानमंत्री नरेंद्र यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देऊन केलेल्या साफसफाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जळगाव तालुक्यातील विविध देवस्थानांची भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 15) स्वच्छता केली. वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदिर, कानळदा येथील महर्षी कण्वाश्रम, रिधुर येथील अवचित हनुमान मंदिराचा त्यात समावेश होता. भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर … The post जळगाव तालुक्यातील देवस्थानांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वच्छता appeared first on पुढारी.

जळगाव तालुक्यातील देवस्थानांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वच्छता

जळगाव  : प्रधानमंत्री नरेंद्र यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराला भेट देऊन केलेल्या साफसफाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जळगाव तालुक्यातील विविध देवस्थानांची भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 15) स्वच्छता केली. वडनगरी येथील बडे जटाधारी महादेव मंदिर, कानळदा येथील महर्षी कण्वाश्रम, रिधुर येथील अवचित हनुमान मंदिराचा त्यात समावेश होता.
भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्यासोबत जळगाव तालुकाध्यक्ष ॲड. हर्षल प्रल्हाद चौधरी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जगदीश सोनवणे, उपाध्यक्ष सचिन पवार, चिटणीस बाळकृष्ण कोळी तसेच समाधान सोनवणे, किनोद येथील नरेंद्र पाटील, फुपनगरी येथील ज्ञानेश्वर बडगुजर व इतर तरुणांनी तिन्ही देवस्थानांच्या साफसफाईचे काम पूर्ण केले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेला परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त सहकार्य केले.
हेही वाचा :

FIFA best player 2023 : मेस्सीने आठव्यांदा पटकावला ‘फिफा’चा सर्वोत्कृष्ट पुरूष पुरस्कार; स्पेनची बोनमती ठरली सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू
Maratha Reservation : वरवंडला सापडली 1871 मधील मराठा कुणबी नोंद

Latest Marathi News जळगाव तालुक्यातील देवस्थानांची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वच्छता Brought to You By : Bharat Live News Media.