नोकरीची संधी! कारागृह विभागात २५५ पदांसाठी भरती

नोकरीच्या संधी : जॉर्ज क्रूझ  महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) एकूण – 255 पदे भरावयाची आहेत. 21 जानेवारी 2024 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी http://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. भरावयाची पदे व अर्हता : लिपिक – 125 पदे – मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी … The post नोकरीची संधी! कारागृह विभागात २५५ पदांसाठी भरती appeared first on पुढारी.

नोकरीची संधी! कारागृह विभागात २५५ पदांसाठी भरती

नोकरीच्या संधी : जॉर्ज क्रूझ 
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) एकूण – 255 पदे भरावयाची आहेत. 21 जानेवारी 2024 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी http://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
भरावयाची पदे व अर्हता :
लिपिक – 125 पदे –
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण.
वरिष्ठ लिपिक – 31 पदे –
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण.
लघुलेखक निम्नश्रेणी – 4 पदे –
SSC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्टहॅण्ड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण.
मराठी/इंग्रजी – 40 प्रति शब्द मि.
मिश्रक – 27 पदे –
SSC/HSC किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून Bombay State Pharmacy Council ला नावनोंदणी आवश्यक. अनुभव असल्यास प्राधान्य. (B.Farm/D.Farm).
शिक्षक – 12 पदे –
SSC/HSC किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण.
प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य.
शिवणकाम निदेशक –
10 पदे – SSC/ महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
सुतारकाम निदेशक – 10 पदे – SSC/ महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र, तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव प्रमाणपत्र.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 8 पदे –
भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
बेकरी निदेशक – 4 पदे –
SSC/ महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राप्ट मॅनाशीपचे प्रमाणपत्र, तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणार्‍या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
ताणाकार – 6 पदे –
SSC/HSC व महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशिनवर, सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
विणकाम निदेशक – 2 पदे –
शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र, तसेच दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक.
चर्मकला निदेशक – 2 पदे –
SSC/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फूटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक. कच्चा मालाचा हिशेब ठेवकास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षांचा अनुभव.
तंत्रनिदेशक -2 पदे –
SSC/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे तांत्रिक चरलहळपळीीं प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
तसेच मिटिंग अ‍ॅण्ड विव्हिंग निर्देशक, करवत्या, लोहारकाम, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपी निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक व शारीरिक शिक्षण निदेशक या पदांचाही समावेश आहे.
पात्रता – भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा – 1 जानेवारी 2024 पर्यंत खुला वर्ग 38 वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्षे. परीक्षा फी खुला – 1000 रु., राखीव – 900 रु. परीक्षेचे स्वरूप – लिपिक पदासाठी व वरिष्ठ लिपिक पदासाठी ः मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी व अंकगणित-25 प्रश्न. एकूण – 100 प्रश्न 200 गुण. वेळ 2 तास.
लघुलेखक नि. श्रेणी व इतर पदांसाठी ः
मराठी – प्रश्न 15, इंग्रजी प्रश्न 15, सामान्यज्ञान प्रश्न – 15 बौद्धिक चाचणी व अंकगणित – प्रश्न – 15, एकूण 60 प्रश्न, 120 गुण.
व्यावसायिक चाचणी – 40 मिनिटे
परीक्षा कालावधी – 80 मिनिटे
एकूण गुणाच्या किमान 45% मिळविणे आवश्यक आहे.
संदर्भ ः
मराठी बाळासाहेब शिंदे,
English – एम. जे. शेख.
गणित व बुद्धीमापन वसे.
सामान्यज्ञान-ल्युसेन्ट मुनेकर आतापर्यंत झालेले TCS व IBPS चे पेपर सोडवा.
Latest Marathi News नोकरीची संधी! कारागृह विभागात २५५ पदांसाठी भरती Brought to You By : Bharat Live News Media.