
चंदीगड : वृत्तसंस्था
प्रेयसीला उत्तीर्ण करण्यासाठी प्रियकराने चक्क तरुणीची वेशभूषा परिधान करून परीक्षेला बसण्याचा प्रयत्न केला. परीक्षेच्या हॉल तिकिटावरही तसा फोटो चिकटविला होता. प्रेयसीला उत्तीर्ण करण्यासाठी त्याने ‘ती’ बनण्याचा प्रयत्न केला होता. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
फरीदकोट येथील परीक्षा केंद्रावर मुलीच्या वेशभूषेत चुडीदार घालून नट्टापट्टा करून तो आला होता. पर्यवेक्षकाच्या प्रसंगावधानामुळे त्याची तोतयागिरी पकडण्यात आली. त्याचे नाव अंग्रेजसिंह असे असल्याचे तपासातून पुढे आले आहे. परमजित कौर नामक मुलीवर तो प्रेम करीत होता. पॅरामेडिकल भरती परीक्षेत प्रेयसी उत्तीर्ण व्हावी, यासाठी त्याने तोतयागिरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :
देशात होणार 1 लाख कोटीची उलाढाल!
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण हे माझे भाग्य; पंतप्रधान मोदी
The post प्रेयसीसाठी तरुणीच्या वेशभूषेत ‘तो’ पोहोचला परीक्षा हॉलमध्ये appeared first on Bharat Live News Media.
