Spanish Super Cup : बार्सिलोनाला हरवून रियाल माद्रिद चॅम्पियन; विनिसियसची हॅट्ट्रिक
रियाध (सौदी अरेबिया), वृत्तसंस्था : विनिसियस ज्युनिअरच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रियाल माद्रिदने सौदी अरेबियात झालेल्या अंतिम सामन्यात आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोना संघाला 4-1 असे हरवून स्पॅनिश सुपर कप (Spanish Super Cup) फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. रविवारी झालेल्या सामन्यात विनिसियसने पूर्वार्धातच हॅट्ट्रिक नोंदवून रियाल माद्रिदचा विजय निश्चित केला.
सुपर कपमध्ये रियाल माद्रिदचे हे 13 वे अजिंक्यपद आहे. बार्सिलोनाने 14 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. विनिसियसने पहिला गोल केल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा जल्लोष केला. रियालकडून चौथा गोल रॉड्रिगोने केला. बार्सिलोनाकडून एकमेव गोल लेवाँडोस्कीने पहिल्या हाफमध्ये केला. (Spanish Super Cup)
सध्याच्या घडीला लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जातात. विशेष म्हणजे, मेस्सी हा पूर्वी बार्सिलोनाकडून, तर रोनाल्डो रियाल माद्रिदकडून खेळत होते. त्यामुळे हे दोन संघ जेव्हा आमनेसामने येत त्यावेळी जगातील सर्वात हायव्होल्टेज सामना बनत असे. परंतु, आता दोन्ही खेळाडूंनी नवीन क्लब निवडल्यामुळे या सामन्यात तितकीशी ईर्ष्या जाणवली नाही.
हेही वाचा…
Ranji Trophy 2024 : 110 धावा काढताना ‘कर्नाटक’ची उडाली गाळण! ‘गुजरात’चा रोमहर्षक विजय
Sikandar Raza : रझाने मोडला ख्रिस गेल-ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
The post Spanish Super Cup : बार्सिलोनाला हरवून रियाल माद्रिद चॅम्पियन; विनिसियसची हॅट्ट्रिक appeared first on Bharat Live News Media.