इराणने ‘मोसाद’च्‍या मुख्‍यालयावर डागले क्षेपणास्त्र, चार जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर इराकी शहर एरबिलजवळ इस्रायलची गुप्‍तचर संस्‍था मोसादच्‍या मुख्‍यालयावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणने इराकची सीमा ओलांडून इस्रायलच्या गुप्तचर मुख्यालयावर ही कारवाई केल्‍याची माहिती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनेच दिली असल्‍याचे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले आहे . दरम्‍यान, या हल्ल्याला इस्रायली अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक … The post इराणने ‘मोसाद’च्‍या मुख्‍यालयावर डागले क्षेपणास्त्र, चार जणांचा मृत्यू appeared first on पुढारी.
इराणने ‘मोसाद’च्‍या मुख्‍यालयावर डागले क्षेपणास्त्र, चार जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : उत्तर इराकी शहर एरबिलजवळ इस्रायलची गुप्‍तचर संस्‍था मोसादच्‍या मुख्‍यालयावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणने इराकची सीमा ओलांडून इस्रायलच्या गुप्तचर मुख्यालयावर ही कारवाई केल्‍याची माहिती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनेच दिली असल्‍याचे वृत्त ‘अल जझीरा’ने दिले आहे . दरम्‍यान, या हल्ल्याला इस्रायली अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवाशांना अरिबल विमानतळावरच थांबवण्यात आले आहे. Iran-Israel Conflict
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सने सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरोधातही हल्ले केले आहेत. अलीकडेच इराणमध्ये बॉम्बस्फोट झाला, ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. हा हल्‍ला इस्त्रायलने घडवून आणल्‍याचा आरोप इराणने केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला.
इराणने म्‍हटलं आहे की, उत्तर इराकी शहर एरबिल जवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. एर्बिलच्या उत्तर-पूर्वेला सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमेरिकन दूतावास तसेच नागरी वस्त्यांपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नसल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्‍हटले आहे.
एरबिलमधील अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराकमधील एरबिल शहरातील अमेरिकेच्‍या दुतावासाजवळही अनेक स्फोट झाले आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्‍लेखोरांनी अमेरिकन वाणिज्य दूतावास जवळील आठ ठिकाणांना लक्ष्य केले.
इराणमध्ये मागील आठवड्यात झालेल्या बॉम्बस्फोटात 100 जणांचा मृत्यू
गेल्या आठवड्यात इराणमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले होते, ज्यामध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोटामुळे इस्रायल-हमास युद्धाचा धोका वाढला आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन अरब देशांना भेट देऊ शकतात. इराण आणि हमासने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, दोन्‍ही देशांनी हे आरोप फेटाळले होते.

Explosion reported in Baharka, north of Erbil, in the Kurdish region of northern Iraq. This comes hours after the IRGC claimed responsibility for attacking and destroying a Mossad headquarters in Erbil.
🔴 LIVE updates: https://t.co/MJGIKGcbiA pic.twitter.com/j8gSBVLKRX
— Al Jazeera English (@AJEnglish) January 16, 2024

 
Latest Marathi News इराणने ‘मोसाद’च्‍या मुख्‍यालयावर डागले क्षेपणास्त्र, चार जणांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.