हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर धोनीचा ‘हा’ महान विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामनाही जिंकून अफगाण संघाला क्लीन स्वीप करण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असणार आहे. दरम्यान, जर भारतीय संघाने … The post हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर धोनीचा ‘हा’ महान विक्रम! appeared first on पुढारी.

हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर धोनीचा ‘हा’ महान विक्रम!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record : सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामनाही जिंकून अफगाण संघाला क्लीन स्वीप करण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असणार आहे. दरम्यान, जर भारतीय संघाने मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला तर रोहित शर्मा हा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या एका खास विक्रमाची बरोबरी करणार आहे.

Ranji Trophy 2024 : 110 धावा काढताना ‘कर्नाटक’ची उडाली गाळण! ‘गुजरात’चा रोमहर्षक विजय
Sikandar Raza : रझाने मोडला ख्रिस गेल-ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

धोनीचा महान विक्रम धोक्यात (Rohit Sharma Record)
रोहित शर्माने आतापर्यंत 53 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. यापैकी टीम इंडियाने 41 सामने जिंकले असून केवळ 12 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धचा मालिकेतील शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत तो एमएस धोनीची बरोबरी करेल.

INDvsENG Test Series : अश्विन-अँडरसन बनवणार मोठा विक्रम, भारत-इंग्लंड मालिकेत रचणार इतिहास

धोनीने भारतीय कर्णधार म्हणून 72 टी-20 सामने खेळले. यापैकी टीम इंडियाने 42 सामने जिंकले तर 28 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, 2 सामने रद्द झाले. तर एक सामना सामना टाय झाला होता. हा टाय सामना भारतीय संघाने बाऊल आउटमध्ये जिंकला होता.
रोहितच्या नावावर ‘हा’ खास विक्रम
अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेला दुसरा टी-20 सामना हा रोहित शर्माच्या कारकिर्दीतील 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याच्या आधी, कोणत्याही खेळाडूने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 सामने खेळलेले नाहीत. अशा परिस्थितीत 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो जगातील पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. या यादीत पॉल स्टर्लिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 134 सामने खेळले आहेत. (Rohit Sharma Record)
Latest Marathi News हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर धोनीचा ‘हा’ महान विक्रम! Brought to You By : Bharat Live News Media.