हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावरच शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

सेनगाव पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हातबल झाला असून, प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी आज (दि. १५) रोजी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. येथील सापडगाव पाटी ते तहसील कार्यालयापर्यंत आज सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या २०२३-२४ मध्ये खरीप रब्बी पिकावर येल्लो मोझ्याक रोग … The post हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावरच शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा appeared first on पुढारी.

हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावरच शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

सेनगाव Bharat Live News Media वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हातबल झाला असून, प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी आज (दि. १५) रोजी विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. येथील सापडगाव पाटी ते तहसील कार्यालयापर्यंत आज सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या २०२३-२४ मध्ये खरीप रब्बी पिकावर येल्लो मोझ्याक रोग पडला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक समीकरण कोलमडले, दैनंदिन गरजा भागविणे अवघड बनले आहे. महसूल विभागाकडून पीक नुकसानीचे पंचनामे केले. परंतु नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पिक विम्याची रक्कमही मिळाली नाही. तात्काळ पीक नुकसान भरपाई व पिक विमा मिळावा यासह विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी नेते मारुती गीते, महादेव हारण, वसंतराव अवचार, नामदेव गीते, संतोष खोडके, बंडू दळवी यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार श्री. गायकवाड यांच्याकडे सादर केले.
हेही वाचा 

Sikandar Raza : रझाने मोडला ख्रिस गेल-ब्रेंडन मॅक्युलमचा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Sensex- Nifty | नवा उच्चांक! सेन्सेक्स ७३ हजार पार, निफ्टी पहिल्यांदाच २२ हजारांवर, ‘हे’ घटक ठरले महत्त्वाचे

Latest Marathi News हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावरच शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा Brought to You By : Bharat Live News Media.