
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या रामलल्लाची मूर्ती अयाेध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी राेजी हाेणार्या अभिषेकासाठी निवडण्यात आली आहे, अशी अमाहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून शेअर केली आहे.
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीरोजी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तीन मूर्त्यांपैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे, अशी माहिती यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावरून दिली. दरम्यान आज आयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या संदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली.
मंत्री प्रल्हाद जोशी यांनी X वर यापूर्वी लिहिले होते की, ‘जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत प्रतिष्ठापना होणार आहे. राम आणि हनुमान यांच्या अतूट नात्याचे हे प्रतीक आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातील अरुण यांनी रामललाची मूर्ती साकारणे ही एक महत्त्वाची सेवा आहे.
“The Murti sculpted on Krishna Shila, by renowned sculptor Arun Yogiraj, has been selected as Shri Vigraha of Bhagwan Shri Ramlalla Sarkar, “tweets Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra pic.twitter.com/a6o6aWg5LI
— ANI (@ANI) January 15, 2024
कर्नाटक के प्रसिद्ध मूर्तिकार श्री अरुण योगीराज द्वारा कृष्णशिला पर निर्मित मूर्ति का चयन भगवान श्री रामलला सरकार के श्री विग्रह के रूप में प्रतिष्ठित होने हेतु किया गया है।
The Murti sculpted on Krishna Shila, by renowned sculptor Shri Arun Yogiraj, has been selected as Shri…
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 15, 2024
अचल मूर्तीसाठी १२ दगड मागवले होते
रामलल्लाच्या अचल मूर्तीच्या निर्मितीसाठी ट्रस्टने नेपाळच्या गंडकी नदीसह कर्नाटक, राजस्थान आणि ओरिसा येथून १२ प्रकारचे उच्च दर्जाचे दगड आणले होते. या सर्व दगडांची चाचणी केली असता केवळ राजस्थान आणि कर्नाटकातील खडकच मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचे आढळले. त्यामुळेच या खडकांची निवड करण्यात आली. कर्नाटकातील श्याम शिला आणि राजस्थानच्या मकराना येथील संगमरवरी खडक त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे निवडले गेले. मकराना दगड अतिशय कठीण आणि कोरीव कामासाठी उत्तम आहे. त्याची चमक शतकानुशतके टिकते. त्याचबरोबर कर्नाटकातील श्याम शिलेवर कोरीव काम सहज केले जाते. हे खडक पाणी प्रतिरोधक आहेत आणि त्यांचे आयुष्य अधिक आहे.
कोण आहेत मूर्तीकार योगीराज?
प्रसिद्ध शिल्पकार योगीराज हे सर्वपरिचित नाव असून सोशल मीडियावर त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. म्हैसूर राजवाड्यातील कारागीरांच्या कुटुंबातून ते येतात. अरुणच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. एमबीएचे शिक्षण घेतलेले योगीराज हे पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत. एमबीएची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु, २००८ मध्ये शिल्पकार बनण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. महाराजा जयचमराजेंद्र वोडेयार यांच्यासह अनेक व्यक्तिमत्त्वांचे पुतळे बनवले.
केदारनाथ येथे स्थापित आदी शंकराचार्यांचा पुतळा तयार करण्याबरोबरच, योगीराज यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयर यांचा १४.५ फूट पांढरा संगमरवरी पुतळा तयार केला आहे. महाराजा श्री कृष्णराजा वाडेयर-चतुर्थ आणि म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पांढरा संगमरवरी पुतळाही त्यांनी तयार केला आहे. अरुण यांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा साकारला आहे.
हेही वाचा:
डॉ. योगेश व डॉ. स्मितादेवी जाधव यांना अयोध्या सोहळ्याचे निमंत्रण
अयोध्या हे भारतीय अस्मितेचे प्रतीक : मंत्री नितीन गडकरी
Ayodhya Airport : अयोध्येतील विमानतळ आता ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम’ केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
The post ‘योगीराज’ यांनी साकारलेल्या राम मूर्तीची होणार प्राणप्रतिष्ठा, ट्रस्टची अधिकृत घोषणा appeared first on Bharat Live News Media.
