प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : राम मंदिर गर्भगृहात PM मोदींसह ‘हे’ चार पाहुणे राहणार उपस्‍थित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणार्‍या या सोहळ्यात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन तासांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. या काळात गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह केवळ पाच विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इतर लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ … The post प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : राम मंदिर गर्भगृहात PM मोदींसह ‘हे’ चार पाहुणे राहणार उपस्‍थित appeared first on पुढारी.
प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : राम मंदिर गर्भगृहात PM मोदींसह ‘हे’ चार पाहुणे राहणार उपस्‍थित


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणार्‍या या सोहळ्यात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन तासांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. या काळात गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह केवळ पाच विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. इतर लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज (दि.१५) दिली.
प्राणप्रतिष्ठा दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि ती दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री रामजन्मभूमी क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित राहणार आहेत, असेही चंपत राय यांनी सांगितले.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमासाठी सात हजारांहून अधिक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रण पत्र देण्यापूर्वी ही माहिती टपाल खात्यामार्फत साधूसंतांनाही पाठवण्यात आली. यामध्ये कार्यक्रमादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ, सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आणि आपले मनोगत व्‍यक्‍त करतील.

#WATCH |” Inside Ram temple’s ‘Garbh Griha’, PM Modi, RSS chief, UP CM, Nritya Gopal ji Maharaj, UP Governor and all temple trustees will remian present. Over 150 saints, experts from different fields and Padma awardees have also been invited to the program,” says Champat Rai,… pic.twitter.com/ELv6h6zH4d
— ANI (@ANI) January 15, 2024

#WATCH | Champat Rai, General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra trust says, “The ‘Pran Prathishtha’ is expected to conclude by 1pm. PM and others present on the occasion will express their thoughts after the ceremony. As per tradition, gifts in 1000 baskets have… pic.twitter.com/zBOaNNtJwK
— ANI (@ANI) January 15, 2024

हेही वाचा : 

Ayodhya Cleanliness campaign : PM माेदींचा १४ जानेवारीपासून अयाेध्‍या ‘स्वच्छता’ मोहिम संकल्‍प
राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : सरसंघचालक म्‍हणाले, “भारत स्‍वबळावर…”
Ram Temple Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ५५ देशांच्‍या प्रमुखांना आमंत्रण

 
 
 
 
The post प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : राम मंदिर गर्भगृहात PM मोदींसह ‘हे’ चार पाहुणे राहणार उपस्‍थित appeared first on Bharat Live News Media.

Go to Source