लग्नाचा तगादा पडला महागात; प्रेयसीचा खाणीत ढकलून खून

चाकण : प्रियकराशी लग्न व्हावे यासाठी तिने पतीला सोडले. पण, प्रियकराने दुसर्‍या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे प्रेयसीने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे प्रियकराने तिचा दगडांच्या खाणीत ढकलून खून केला. ही घटना खराबवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय 27, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात … The post लग्नाचा तगादा पडला महागात; प्रेयसीचा खाणीत ढकलून खून appeared first on पुढारी.

लग्नाचा तगादा पडला महागात; प्रेयसीचा खाणीत ढकलून खून

चाकण : प्रियकराशी लग्न व्हावे यासाठी तिने पतीला सोडले. पण, प्रियकराने दुसर्‍या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे प्रेयसीने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे प्रियकराने तिचा दगडांच्या खाणीत ढकलून खून केला. ही घटना खराबवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय 27, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खून झालेली महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे सन 2010 पासून प्रेमसंबंध होते. सन 2018 मध्ये महिलेचे लग्न झाले. लग्नानंतर ती पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी माहेरी राहू लागली. त्यानंतर तिचे देवेंद्रकुमार यांच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले. दरम्यान देवेंद्रकुमार याची त्याच्या भावाच्या मेहुणी सोबत लग्नाची बोलणी सुरू झाली. ही बाब महिलेला समजली असता तिने देवेंद्रकुमार याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्रकुमार याने तिला गावावरून बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. त्यानंतर जवळच असलेल्या खाणीत ढकलून दिले. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.
हेही वाचा

मुंबईत पालिकेच्या बंद शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट
तुम्ही पण नकली तूप खाता का? शुद्ध देशी तूप कसे ओळखावे?
Vegetables Market : राजस्थानी गाजर अन् मध्यप्रदेशातील मटारची चलती

Latest Marathi News लग्नाचा तगादा पडला महागात; प्रेयसीचा खाणीत ढकलून खून Brought to You By : Bharat Live News Media.