स्वयंपाकावरुन पत्नीला टोमणे मारणे ‘क्रूरता’ ठरत नाही : उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पत्‍नीला तिच्‍या स्वयंपाकावरुन टोमणे मारणे हे भारतीय दंड विधान ( आयपीसी ) कलम ४९८ अ अंतर्गत क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण नुकतेच मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे. तसेच या प्रकरणी पतीच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल करण्‍यात आलेला गुन्‍हा रद्‍द करण्‍याचा आदेशही न्‍यायालयाने दिला आहे. ( Comments about wife’s cooking not cruelty under Section … The post स्वयंपाकावरुन पत्नीला टोमणे मारणे ‘क्रूरता’ ठरत नाही : उच्च न्यायालय appeared first on पुढारी.
स्वयंपाकावरुन पत्नीला टोमणे मारणे ‘क्रूरता’ ठरत नाही : उच्च न्यायालय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पत्‍नीला तिच्‍या स्वयंपाकावरुन टोमणे मारणे हे भारतीय दंड विधान ( आयपीसी ) कलम ४९८ अ अंतर्गत क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण नुकतेच मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नोंदवले आहे. तसेच या प्रकरणी पतीच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल करण्‍यात आलेला गुन्‍हा रद्‍द करण्‍याचा आदेशही न्‍यायालयाने दिला आहे. ( Comments about wife’s cooking not cruelty under Section 498A IPC: Bombay High Court )
काय होते प्रकरण?
१३ जुलै २०२० रोजी लग्न झाले विवाहितेला सासर्‍याच्‍या मंडळींनी नोव्हेंबर 2020 मध्ये घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर तिने 9 जानेवारी 2021 रोजी फिर्याद दिली होती. तिने फिर्यादीत म्‍हटले होते की, पती तिच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करू शकला नाही.पतीचे भाऊ तिला स्वयंपाक करायला येत नाही. तुम्‍ला आई-वडिलांनी काहीच शिकवलं नाही, असे टोमणे मारत सातत्‍याने टिंगल-टवाळी करतात, असा आरोप पत्नीने तक्रारीत केला होता. या प्रकरणी पतीच्‍या नातेवाईकांविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. ( Comments about wife’s cooking not cruelty under Section 498A IPC: Bombay High Court )
पतीच्‍या नातेवाईकांची उच्‍च न्‍यायालयात धाव
पत्‍नीने दिलेल्‍या फिर्यादीनंतर पती आणि त्‍याच्‍या नातेवाईकांविरुद्ध आयपीसीच्या कलम ४९८ अ नुसार गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईविरोधात नातेवाईकांनी उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. त्‍यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती एनआर बोरकर यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ( Comments about wife’s cooking not cruelty under Section 498A IPC: Bombay High Court )
नातेवाईकांविरुद्धचा गुन्‍हा रद्द करण्‍याचा आदेश
खंडपीठाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्‍यानंतर स्‍पष्‍ट केले की, “या प्रकरणात या याचिकाकर्त्यांवर एकच आरोप करण्यात आला आहे की त्यांनी टिप्पणी केली होती की, महिलेला स्वयंपाक कसा करावा हे माहित नाही, अशा टिप्पण्यांना आयपीसी कलम ४९८ अ अंतर्गत ‘क्रूरता’ समजत नाही. या कलमान्‍वये किरकोळ मारामारी ही क्रूरता मानली जात नाही. कलम 498A अन्वये गुन्हा सिद्ध करण्‍यासाठी, स्‍त्रीवर सतत क्रूरता केली जात होती हे सिद्‍ध करावे लागेल, असे स्‍पष्‍ट करत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.
कलम ‘४९८ अ’
विवाहित महिलांच्‍या सुरक्षेबरोबरच घरगुती वा कौटुंबिक हिंसाचार रोखण्‍यासाठी १९८४ मध्‍ये ४९८ अ’ या कायद्याची अंमलबजावणी झाली. या कायदान्‍वये प्रथमच विवाहित महिलेला होणार्‍या मानसिक त्रासाचीही दखल घेतली गेली. या कायद्यान्वये पीडित स्त्री स्वत: किंवा तिचे आई-वडील किंवा तिचे नातेवाईक तक्रार करू शकतात. ‘४९८ अ’अन्वये पती किंवा त्याच्या नातेवाईकांनी विवाहितेला क्रूर वागणूक दिल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. विवाहित स्त्री या कलमान्‍वये पती, सासू-सासरे, नणंद, दीर आणि अन्य नातेवाईक, ज्यांनी तिचा छळ केला किंवा तिला स्वत:ला इजा पोहोचवण्यास प्रवृत्त केले, अशाविरुद्ध न्यायालयात दाद मागू शकते. त्यांच्यावर दखलपत्र गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकते.

Merely Commenting About Lack Of Woman’s Cooking Skills Not ‘Cruelty’ U/S 498A IPC: Bombay High Courthttps://t.co/F59IjGOVZC
— Live Law (@LiveLawIndia) January 15, 2024

हेही वाचा : 

High Court | ‘प्रेम होते, वासना नाही’! अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी संशयिताला जामीन मंजूर
Supreme Court | ‘मी जिवंत आहे’! ११ वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच खून खटल्यात कोर्टात दिली साक्ष, काय आहे प्रकरण?
Supreme Court : नालेसफाई करताना कामगार मृत्युमुखी पडल्यास कुटुंबियांना ३० लाखांची भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 
 
Latest Marathi News स्वयंपाकावरुन पत्नीला टोमणे मारणे ‘क्रूरता’ ठरत नाही : उच्च न्यायालय Brought to You By : Bharat Live News Media.