सिंहगडावर वाहतूक कोंडीने प्रचंड हाल; पर्यटकांकडून सव्वा लाखांचा टोल वसूल

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगडावर रविवारी (दि. 14) मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळीच गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने गडाच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लहान मुले, महिलांसह पर्यटकांचे हाल झाले. दिवसभरात वाहनचालक पर्यटकांकडून वनविभागाने तब्बल 1 लाख 27 हजार रुपयांचा टोल गोळा केला. खडकवासला धरण चौपाटीसह राजगड, तोरणा गडकोट गजबजले … The post सिंहगडावर वाहतूक कोंडीने प्रचंड हाल; पर्यटकांकडून सव्वा लाखांचा टोल वसूल appeared first on पुढारी.

सिंहगडावर वाहतूक कोंडीने प्रचंड हाल; पर्यटकांकडून सव्वा लाखांचा टोल वसूल

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगडावर रविवारी (दि. 14) मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळीच गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने गडाच्या घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीत अडकलेल्या लहान मुले, महिलांसह पर्यटकांचे
हाल झाले. दिवसभरात वाहनचालक पर्यटकांकडून वनविभागाने तब्बल 1 लाख 27 हजार रुपयांचा टोल गोळा केला.
खडकवासला धरण चौपाटीसह राजगड, तोरणा गडकोट गजबजले होते. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या
संख्येने पर्यटकांनी गर्दी केल्याने सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक नियोजन कोलमडले. सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांच्यासह वनरक्षक, सुरक्षा रक्षकांनी धावपळ करत टप्प्या-टप्प्याने वाहने सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली. सिंहगडावर दिवसभरात पर्यटकांची चारचाकी 536 व दुचाकी 1470 वाहने गेली. वाहनतळ पूर्ण क्षमतेने फुल्ल होऊन जागा मिळेल तेथे पर्यटकांनी वाहने उभी केली. त्यामुळे थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या.
हेही वाचा

दुर्दैवी : डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार; चालकाचे पलायन
तुम्ही पण नकली तूप खाता का? शुद्ध देशी तूप कसे ओळखावे?
मांडवगण फराटा परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीती

Latest Marathi News सिंहगडावर वाहतूक कोंडीने प्रचंड हाल; पर्यटकांकडून सव्वा लाखांचा टोल वसूल Brought to You By : Bharat Live News Media.