दुर्दैवी : डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार; चालकाचे पलायन

नसरापूर: पुढारी वृत्तसेवा : कापूरहोळ-मांढरदेवी या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे दुचाकी घसरून पडली रस्त्यावर पडली. यावेळी खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून समोरून आलेल्या भरधाव डंपरचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. तर एकजण बचावला. घटना घडल्यानंतर डंपर चालकाने पळ काढला. लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५, रा. उंदेरी, ता. महाड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर … The post दुर्दैवी : डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार; चालकाचे पलायन appeared first on पुढारी.

दुर्दैवी : डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार; चालकाचे पलायन

नसरापूर: Bharat Live News Media वृत्तसेवा : कापूरहोळ-मांढरदेवी या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे दुचाकी घसरून पडली रस्त्यावर पडली. यावेळी खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून समोरून आलेल्या भरधाव डंपरचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. तर एकजण बचावला. घटना घडल्यानंतर डंपर चालकाने पळ काढला. लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५, रा. उंदेरी, ता. महाड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर दुचाकीस्वार अविनाश गोपाळ येलमकर (वय ३९) हे बचावले.
सोमवारी (दि. १५) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कापूरहोळ-भोर रस्त्यावर नेकलेस पॉइंट उताराला ही दुर्दैवी घटना घडली आहे. किकवीचे पोलीस हवालदार राजेंद्र चव्हाण, तुळशीराम अहिरे, दिलीप अलगुडे घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र लताबाई जागीच ठार झाल्या होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश येलमकर आपल्या कुटुंबासह पुण्यातील खडकवासला येथे कामानिमित्त राहत आहे. मकरसंक्रांत दिनी मुळगाव असलेल्या उंदेरी या गावची पूजा असल्याने गावाकडे अविनाश हे आई लताबाई यांना घेऊन जात असताना रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरली. यावेळी समोरून येणाऱ्या डंपर चालकाने गाडीचा वेग कमी न केल्याने महिलेच्या डोक्यावरून चाक गेले. तर अविनाश यांनी डोक्यात हेल्मेट घातल्याने बचावले.
हेही वाचा

तुम्ही पण नकली तूप खाता का? शुद्ध देशी तूप कसे ओळखावे?
Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत ६ ठार
बर्फाळ प्रदेशात स्नान करणेही दुरापास्त!

Latest Marathi News दुर्दैवी : डंपरच्या धडकेत महिला जागीच ठार; चालकाचे पलायन Brought to You By : Bharat Live News Media.