नागपूर : लवकरच काँग्रेसला पडेल खिंडार : डॉ आशीष देशमुख

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडलेले दिसेल असा दावा माजी आमदार, भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते डॉ आशिष देशमुख यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या संदर्भात अलीकडेच हा दावा केला होता. आज देशमुख यांनी दोन माजी कार्याध्यक्ष व दोन माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे, काँग्रेसचा ‘हात’ सोडत … The post नागपूर : लवकरच काँग्रेसला पडेल खिंडार : डॉ आशीष देशमुख appeared first on पुढारी.

नागपूर : लवकरच काँग्रेसला पडेल खिंडार : डॉ आशीष देशमुख

नागपूर ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडलेले दिसेल असा दावा माजी आमदार, भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते डॉ आशिष देशमुख यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या संदर्भात अलीकडेच हा दावा केला होता. आज देशमुख यांनी दोन माजी कार्याध्यक्ष व दोन माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे, काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपचे ‘कमळ’ हाती घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केल्यामुळे आता हे काँग्रेसचा हात सोडणारे युवा नेते नेमके कोण? या विषयीची उत्सुकता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
मुंबई काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत धनुष्यबाण जवळ केले. यानंतर अनेक तरुण नेते, पदाधिकारी काँग्रेसमध्ये आपले भवितव्य नाही, काँग्रेस नेते राहुल गांधी तरुणांच्या नेतृत्वाला वाव देऊ शकत नाहीत, या इराद्याने पक्षातून दूर जातील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीला अनेक जण पक्षात कंटाळले आहेत. मात्र राहुल गांधी नाना पटोले यांना सोडण्यास तयार नाहीत. नव्या नेतृत्वाला संधी मिळत नसल्याने येणाऱ्या काळात भाजप, शिवसेना व महायुतीच्या दिशेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत विदर्भातच नव्हे तर राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसला खिंडार पडल्याशिवाय राहणार नाही असा दावा देशमुख यांनी केला. अर्थातच त्यांचा दावा खरा की दबावतंत्र हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : 

Munawwar Rana Passes Away : प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन 
Devendra Fadnavis : कारसेवक बाबरीचा ढाचा पाडत होते, तेव्हा तुम्ही निसर्गाचे फोटो काढत होता : फडणवीस  
MHT CET | एमएचटी सीईटीची नोंदणी उद्यापासून

Latest Marathi News नागपूर : लवकरच काँग्रेसला पडेल खिंडार : डॉ आशीष देशमुख Brought to You By : Bharat Live News Media.