राजस्थानमध्ये भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत ६ ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात दोन कारच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.१५) लक्ष्मणगड तहसीलमधील महामार्गावर घडली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच खासदार सुमेधानंद आणि आयजी सीकर यांनी रुग्णालयात पोहोचून जखमींशी चर्चा केली. हा अपघात लक्ष्मणगढ शहराजवळ महामार्गावर असलेल्या मणिमहल हॉटेलसमोर घडला. मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून बोलेरोतून हे लोक दातरामगड येथील खरियावास या गावी जात होते. तर इर्टिगा कार सीकरहून लक्ष्मणगडच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.
Six killed, 5 injured as cars collide in Rajasthan’s Sikar
Read @ANI Story | https://t.co/yHEUjPw3x7#Rajasthan #Sikar #accident #RoadAccident pic.twitter.com/YfaY71iqG4
— ANI Digital (@ani_digital) January 15, 2024
हेही वाचा :
प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे निधन
विमान उड्डाणाला विलंब, प्रवाशाची थेट पायलटला मारहाण
दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे गाड्या उशिरा, विमानांची उड्डाणे रद्द
Latest Marathi News राजस्थानमध्ये भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत ६ ठार Brought to You By : Bharat Live News Media.