ई-लर्निंग स्कूलची घंटा वाजणार कधी? कात्रज येथील काम आठ वर्षांपासून अर्धवट

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील अ‍ॅमिनिटी स्पेसच्या आरक्षित जागेत 26 जानेवारी 2016 रोजी भूमिपूजन झाल्यापासून ई-लर्निंग स्कूलच्या इमारतीचे काम सुरुच आहे. आठ वर्षे उलटूनही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. सध्या हे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होऊन शाळा भरणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तत्कालीन नगरसेविका … The post ई-लर्निंग स्कूलची घंटा वाजणार कधी? कात्रज येथील काम आठ वर्षांपासून अर्धवट appeared first on पुढारी.

ई-लर्निंग स्कूलची घंटा वाजणार कधी? कात्रज येथील काम आठ वर्षांपासून अर्धवट

रवी कोपनर

कात्रज : Bharat Live News Media वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील अ‍ॅमिनिटी स्पेसच्या आरक्षित जागेत 26 जानेवारी 2016 रोजी भूमिपूजन झाल्यापासून ई-लर्निंग स्कूलच्या इमारतीचे काम सुरुच आहे. आठ वर्षे उलटूनही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. सध्या हे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होऊन शाळा भरणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
तत्कालीन नगरसेविका भारती कदम यांच्या प्रयत्नातून कात्रज परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग स्कूल प्रकल्प मंजूर कण्यात आला. या कामासाठी पहिल्या टप्प्यात 2016-17च्या अंदाजपत्रकात 1 कोटी 62 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर 2017 पासून तुटपुंज्या निधीची तरतूद करण्यात आली. पुन्हा 2021-22मध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, हे काम पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आणखी किमान पाच कोटी रुपयांची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
ई-लर्निंग स्कूलसाठी पहिल्या फेजमध्ये बेसमेंट पार्किंग आणि वर तीन मजल्यावर 17 वर्ग खोल्या बांधण्यात येत आहे. इमारतीचे तीन मजल्यांपर्यंत आरसीसी काम पूर्ण झाले असून तिसर्‍या मजल्यावर बांधकाम झाले नाही. तसेच दोन मजल्यावर दरवाजे खिडक्या, रंगरंगोटी, अग्निशामक, विद्युत व फर्निचर आदी कामे बाकी आहेत. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात ही पहिली ई-लर्निंग स्कूल आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या इमारतीचे काम पूर्ण होऊन ती शिक्षण विभागाकडे हस्तांतरित होणे गरजेचे असल्याचे माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी सांगितले.
हेही वाचा

Munawwar Rana Passes Away : प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन
विमान उड्‍डाणाला विलंब, प्रवाशाची थेट पायलटला मारहाण
बर्फाळ प्रदेशात स्नान करणेही दुरापास्त!

Latest Marathi News ई-लर्निंग स्कूलची घंटा वाजणार कधी? कात्रज येथील काम आठ वर्षांपासून अर्धवट Brought to You By : Bharat Live News Media.