नशिबाचे कुलूप उघडले आणि बंदही झाले!

कॅलिफोर्निया : कष्ट न करता संपत्ती मिळवणे ही नशिबाची गोष्ट आहे. पण, ती सांभाळणे हे माणसाचे स्वतःचे कौशल्य आहे. लिसा आर्केड नावाच्या महिलेला याचा पुरेपूर प्रत्यय आला. तिच्यासाठी नशिबाचे कुलूप उघडले तसे बंद झाले. देवाने तिला अमाप संपत्ती दिली; पण ती, ती सांभाळू शकली नाही आणि तिने सर्वस्व गमावले. आयुष्यात पैसा कमवावा, असे कोणाला वाटत … The post नशिबाचे कुलूप उघडले आणि बंदही झाले! appeared first on पुढारी.

नशिबाचे कुलूप उघडले आणि बंदही झाले!

कॅलिफोर्निया : कष्ट न करता संपत्ती मिळवणे ही नशिबाची गोष्ट आहे. पण, ती सांभाळणे हे माणसाचे स्वतःचे कौशल्य आहे. लिसा आर्केड नावाच्या महिलेला याचा पुरेपूर प्रत्यय आला. तिच्यासाठी नशिबाचे कुलूप उघडले तसे बंद झाले. देवाने तिला अमाप संपत्ती दिली; पण ती, ती सांभाळू शकली नाही आणि तिने सर्वस्व गमावले.
आयुष्यात पैसा कमवावा, असे कोणाला वाटत नाही? काही लोकांना ते सहज मिळते, तर काहींना त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. ज्यांच्याकडे हे कौशल्य नसते, त्यांच्या हातातून पैसा वाळूसारखा निसटतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. लिसा आर्केड नावाच्या महिलेच्या नशिबाचे कुलूप उघडले तसे बंद झाले. देवाने तिला अमाप संपत्ती दिली; पण ती, ती सांभाळू शकली नाही आणि तिने सर्वस्व गमावले.
तिने 4 वर्षांत कोट्यवधी रुपये पाण्यासारखे खर्च केले आणि नंतर ती पुन्हा जुन्या स्थितीत आली. डेली स्टारच्या वृत्तानुसार, लिसा आर्केड नावाच्या महिलेने लॉटरीमध्ये छोटी रक्कम नाही, तर 8 कोटी 45 लाख 61 हजार रुपये जिंकले होते.
पैसे मिळाल्यानंतर त्याची योग्य गुंतवणूक करण्याऐवजी ती बेपर्वाईने खर्च करू लागली. लिसाने भव्य पार्ट्या केल्या, तिच्या मुलाच्या महागड्या शाळेची फी भरली आणि स्वतःचे रेस्टॉरंट उघडण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, तिची योजना थोडी चुकीची ठरली आणि आर्थिक सेवेच्या सल्ल्यानुसार तिला तिच्या संपत्तीवर मोठा कर भरावा लागला. तोपर्यंत तिने नवीन घर घेतले होते आणि अनेकवेळा सुट्टीवरही गेली होती. त्यानंतर लिसाने कबूल केले की, लॉटरी जिंकल्यानंतर, अशा प्रकारे सर्व पैसे गमावल्यामुळे तिला खूप नैराश्य आले होते.
Latest Marathi News नशिबाचे कुलूप उघडले आणि बंदही झाले! Brought to You By : Bharat Live News Media.